ETV Bharat / sports

IPL 2023 : आज कोलकाता भिडणार पंजाबशी, दोन्ही संघांमध्ये कोलकाताचा वरचष्मा

author img

By

Published : May 8, 2023, 1:22 PM IST

IPL 2023
आयपीएल 2023

कोलकातामध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील लढतीत पराभूत संघाची प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता संपुष्टात येईल आणि त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागेल. आजच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये कोलकाताचा वरचष्मा आहे.

कोलकाता : आयपीएल 2023 दरम्यान खेळल्या जाणार्‍या 53 क्रमांकाच्या सामन्यादरम्यान, आज कोलकाता येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. पंजाब किंग्जला अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. 10 सामन्यांपैकी पाच विजय नोंदवल्यानंतर, तो गुणतालिकेत 7 व्या स्थानावर आहे, तर कोलकाता नाइट रायडर्स आठव्या स्थानावर पोहोचला आहे. या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या क्रमवारीत सुधारणा होईल, पण प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील आणि रनरेटही चांगला ठेवावा लागेल.

केकेआरला धावगती सुधारावी लागेल : पंजाब किंग्जचे लक्ष्य त्यांचे आगामी सर्व सामने जिंकून आपले स्थान मजबूत करण्याचे आहे, परंतु आजच्या सामन्यातील विजयामुळे त्यांना अव्वल 4 संघांमध्ये स्थान मिळवण्याची संधी मिळेल. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सच्या कामगिरीवर नजर टाकली, तर चार सामने जिंकून सहा सामने गमावल्यानंतर त्यांना केवळ ८ गुण जमा करता आले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना त्यांचे आगामी सर्व सामने जिंकावे लागतील तसेच धावगती सुधारावी लागेल. कोलकाताने शेवटचा सामना जिंकताना त्यांच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादचा पराभव केल्याचे तुम्हाला आठवत असेल. नितीश राणा आणि रिंकू सिंग यांच्या उपयुक्त फलंदाजीमुळे कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 171 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले, परंतु संघाने सनरायझर्स हैदराबादला अवघ्या 166 धावांत गुंडाळले.

विक्रम कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूने : कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये कोलकाता नाइट रायडर्सने 20 वेळा विजय मिळवला आहे तर पंजाब किंग्जने 11 सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे पाहिले तर एकूण विक्रम कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूने आहे, तर यंदा शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने चांगली खेळी खेळली आहे.

हेही वाचा : IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा ७ गडी राखून केला पराभव, फिल सॉल्टने ठोकल्या 45 चेंडूत 87 धावा
हेही वाचा : Asian Weightlifting Championship 2023 : 20 वर्षीय जेरेमीचा पराक्रम, आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकले रौप्यपदक!
हेही वाचा : Sonam Kapoor : सोनम कपूरचा लंडनच्या राज्याभिषेक सोहळ्यात सहभाग, नमस्तेसह कलाकारांचे केले स्वागत...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.