ETV Bharat / sports

Legends League Cricket 2nd Season : लिजेंड्स लीग क्रिकेटचा दुसरा सीझन भारतात होणार

author img

By

Published : Jul 23, 2022, 5:38 PM IST

Bret lee
ब्रेट ली

लिजेंड्स लीग क्रिकेटचा दुसरा हंगाम ( Legends League Cricket 2nd Season ) ओमानमधून भारतात हलवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या लीगमध्ये नऊहून अधिक देशांतील क्रिकेट दिग्गज सहभागी होणार आहेत.

नवी दिल्ली: ग्लोबल टी20 लीग लिजेंड्स लीग क्रिकेटने शनिवारी ओमानमधून दुसऱ्या सत्राचे भारतात हस्तांतरण करण्याची घोषणा ( legends league cricket shifted to india ) केली. "क्रिडा क्षेत्रातील दिग्गजांचा भारतातील मोठा चाहता वर्ग आणि भारताकडून पहिल्या सत्राला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन, एलएलसीने सप्टेंबर 2022 मध्ये आगामी हंगामासाठी तळ भारतात हलवण्याचा निर्णय घेतला आहे," असे एका निवेदनात म्हटले आहे.

दुसऱ्या सीझनमध्ये, लिजेंड्स लीग क्रिकेट ( Legends League Cricket ) या स्पर्धेत खेळातील 110 हून अधिक दिग्गज सहभागी होऊन उत्साह वाढवतील. 20 सप्टेंबर 2022 पासून सुरू होणाऱ्या या लीगसाठी क्रिकेटची मैदाने निश्चित केली जात आहेत. यात नऊहून अधिक देशांतील क्रिकेट दिग्गज सहभागी होणार आहेत.

लीजेंड्स लीग क्रिकेटचे सह-संस्थापक आणि सीईओ रमण रहेजा ( Raman Raheja CEO of LLC ) म्हणाले, “आम्हाला चाहत्यांकडून भारतात मालिका आयोजित करण्यासाठी वारंवार विनंत्या येत आहेत. आम्ही लिजेंड्स लीगचा दुसरा सीझन घरी परत आणण्यासाठी उत्सुक आहोत. आमच्या येथे क्रिकेट चाहत्यांची संख्या सर्वाधिक आहे. पहिल्या सत्रात भारताकडून सर्वाधिक प्रेक्षकसंख्या भारताकडे होती, त्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंका आणि त्यानंतर उर्वरित जगाचा क्रमांक लागतो.

आम्ही आमच्या प्रेक्षक आणि क्रिकेट रसिकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी उत्सुक आहोत. आम्हाला खात्री आहे की आमचा तळ भारतात हलवण्याच्या आमच्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना आनंद होईल. कारण थेट क्रिकेट पाहण्याच्या उत्साहाची स्पर्धा होऊ शकत नाही.

हेही वाचा - India vs West Indies : धोनी-गावस्करला धवनने टाकले मागे, वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली ऐतिहासिक खेळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.