ETV Bharat / sports

IPL 2022 RCB VS SRH : आरसीबीचा एसआरएचवर 67 धावांनी मोठा विजय; हैदराबादच्या राहुल त्रिपाठीची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ

author img

By

Published : May 8, 2022, 9:12 PM IST

RCB VS SRH
RCB VS SRH

रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या 54 व्या सामन्यात आरसीबीने एसआरएचवर 67 धावांनी मोठा विजय ( RCB won by 67 runs )मिळवला. या विजयात वानिंदू हसरंगा आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली.

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 54 वा सामना रविवारी दुपारी साडेतीनला खेळला गेला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Royal Challengers Bangalore v Sunrisers Hyderabad ) संघात पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने वानिंदू हसरंगा आणि कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या ( Captain Faf du Plessis ) दमदार प्रदर्शनाच्या जोरावर हैदराबादवर 67 धावांनी मोठा विजय ( Royal Challengers Bangalore won by 67 runs ) मिळवला.

  • That's that from Match 54. @RCBTweets win by 67 runs and add two important points to their tally.#TATAIPL pic.twitter.com/YOHIVDY3mT

    — IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022 s" charset="utf-8">" class="align-text-top noRightClick twitterSection" data=" s" charset="utf-8">"> s" charset="utf-8">

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने ( ( Royal Challengers Bangalore Team ) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना,कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या 73 धावांच्या जोराव 3 बाद 192 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद संघाला 193 धावांचे लक्ष्य दिले होत. या लक्ष्याचा पाठलाग करताना 19.2 षटकात सर्वबाद 125 धावा करता आल्या. ज्यामध्ये फिरकीपटू वानिंदू हसरंगाने ( Spinner Wanindu Hasaranga ) पाच विकेट्स घेतल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची सुरुवात खराब झाली. संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Star batsman Virat Kohli ) पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर मात्र आरसीबीने सावध पवित्रा घेत रजत आणि प्लेसिसने संघाला सावरले. या दोघांनी हैदराबाद संघाचा खरपूस समाचार घेताना, दुसऱ्या विकेट्साठी 12.1 षटकांत 105 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रजच पटिदार 38 चेंडूत 48 धावा काढून बाद झाला.

दरम्यान प्लेसिस सोबत 54 धावांची भागीदारी केल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल 33 (24) ( Batsman Glenn Maxwell ) धावा करुन तंबूत परतला. फाफ डु प्लेसिसने शानदार फलंदाजी करताना, 50 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार लगावत नाबाद 73 धावा केल्या. ज्यामुळे आरसीबी संघाने 3 बाद 192 धावांचा विशाल धावसंख्या उभारली. हैदराबाद संघाकडून गोलंदाजी करताना जे सुचिथने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर कार्तिक त्यागीने 1 विकेट घेतली.

193 धावांच्या पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाची ( Sunrisers Hyderabad Team ) सुरुवात देखील खराब झाली. सनरायझर्स हैदराबाद संघाला डावाच्या पहिल्याच चेंडूवर मोठा झटका लागला. कारण कर्णधार केन विल्यमसन पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला. त्याच्यापाठोपाठ अभिषेक शर्मा देखील परतला. त्यामुळे हैदराबाद संघाची धावसंख्या 2 बाद 1 अशी होती. त्यानंतर एडेन मारक्रम आणि राहुल त्रिपाठीने संघाचा डाव सांभाळताना तिसऱ्या विकेट्ससाठी 50 धावांची भागीदारी केली.

दरम्यान निकोलस पूरन 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र हैदराबाद संघाचे फलंदाज सातत्याने बाद होत राहिले. हैदराबाद संघाकडून सर्वाधिक धावा राहुल त्रिपाठीने ( Rahul Tripathi scored the most runs ) केल्या, त्याने 37 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादच्या सात फलंदाजांना साधा दुहेरी आकडा गाठता आला नाही. आरसीबीकडून गोलंदाजी करताना ज्यामध्ये वानिंदू हसरंगाने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.

हेही वाचा - Ipl 2022 Updates : युवराज सिंगला 'या' खेळाडूमध्ये दिसते स्वत:ची झलक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.