IPL 2022 Updates : चेन्नई सुपर किंग्जला दुसरा धक्का; दीपक चहरनंतर रवींद्र जडेजा आयपीएल स्पर्धेतून बाहेर

author img

By

Published : May 11, 2022, 4:59 PM IST

Updated : May 11, 2022, 11:02 PM IST

Ravindra Jadeja

रवींद्र जडेजा आयपीएल 2022 च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर असू शकतो. त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. याच कारणामुळे तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात उतरला नाही. सध्या त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवले जात आहे. सीएसकेचा अष्टपैलू रवींद्र जडेजा यापुढील उर्वरित आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

मुंबई: चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल 2022 चा हंगाम आतापर्यंत चांगला गेला नाही. एकीकडे संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे संघातील खेळाडू एकामागून एक जखमी होत आहेत. त्यामुळे चेन्नई संघाच्या अडचणीत वाढ होत आहे. आता रवींद्र जडेजाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. त्याच्या हाताला दुखापत झाली ( Injury to Ravindra Jadeja hand ) आहे.

  • 📢 Official Announcement:

    Jadeja will be missing the rest of the IPL due to injury. Wishing our Jaadugar a speedy recovery! @imjadeja

    — Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन ( CSK CEO Kashi Viswanathan ) यांनी पीटीआयला सांगितले की, रवींद्र जडेजा सीएसकेच्या पुढील दोन सामन्यांमध्ये खेळला नाही. बरगडीला दुखापत असल्याने तो घरी परतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे जडेजा दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही खेळू शकला नाही. या हंगामातील पहिल्या आठ सामन्यांमध्ये सुपर किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या जडेजाने 10 सामन्यांमध्ये 20 च्या सरासरीने केवळ 116 धावा केल्या, त्यांच्यासाठी सध्याचा हंगाम निराशाजनक होता. तो 7.51 च्या इकॉनॉमी रेटने फक्त पाच विकेट घेऊ शकला. सीएसकेचा अष्टपैलू रवींद्र जडेजा यापुढे उर्वरित आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या खराब कामगिरीमुळे जडेजाला मध्यंतरी कर्णधारपद सोडावे ( Ravindra Jadeja resigns as captain ) लागले होते. त्याच्या जागी महेंद्रसिंग धोनीला संघाचा कर्णधार बनवण्यात आले. त्यानंतर संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. चेन्नईला आता आयपीएल 2022 मध्ये आणखी तीन सामने खेळायचे आहेत. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी त्यांना कोणत्याही किंमतीत तिन्ही सामने जिंकावे लागतील. त्याच वेळी, आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सचे उर्वरित सामने गमावतील अशी अपेक्षा देखील करावी लागेल. मात्र, तसे होण्याची शक्यता फारच कमी आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून रवींद्र जडेजाच्या दुखापतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. पण फारशी सुधारणा झालेली नाही. अशा परिस्थितीत सीएसकेला जडेजाला खेळवण्याचा धोका पत्करायचा नाही ( CSK does not want to risk ). कारण चेन्नईची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता खूपच धूसर आहे.

हेही वाचा - Birsa Munda International Hockey Stadium : भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम ओडिशामध्ये ऑक्टोबरपर्यंत होणार तयार

Last Updated :May 11, 2022, 11:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.