ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : आयपीएल 2022 स्पर्धेसाठी नवीन नियम जाहीर; आता एका संघाला घेता येणार चार डीआरएस

author img

By

Published : Mar 15, 2022, 3:31 PM IST

IPL 2022
IPL 2022

आयपीएल 2022 या स्पर्धेसाठी बीसीसीआयने नवीन नियम जाहीर ( BCCI new rules ) केले आहेत. ज्यामध्ये प्रत्येक संघाला एका सामन्यात चार डीआरएस घेता ( Four DRS can be taken ) येणार आहेत.

हैदराबाद : यंदा आयपीएल स्पर्धेचा 15 वा हंगाम ( 15th season of IPL ) खेळला जाणार आहे. या हंगामाला 26 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. यंदा होणाऱ्या पंधराव्या हंगामात एकूनण 10 संघ सहभागी होणार आहेत. आयपीएल 2022 या हंगामासाठी सर्व संघ पूर्ण तयारीशी सज्ज झाले आहे. आता या स्पर्धेसाठी बीसीसीआयने काही नवीन नियम जारी ( BCCI issues new rules ) केले आहेत.

नवीन नियमानुसार कोणत्या संघातील खेळाडूला कोरोनाची लागन झाली, तर प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला जाऊ शकतो. त्याचबरोबर कोरोना बाधित खेळाडूंचा आकडा वाढत गेला. तसेच संघाच्या प्लेइंग इलेव्हनसाठी खेळाडू कमी पडत असतील, तर या संघाचा सामना पुन्हा आयोजित केला जाईल. त्यानंतरही काही कारणास्तव हा सामना खेळला गेला नाही, तर त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार तांत्रिक समितीकडे ( Decision to the Technical Committee ) सोपवला जाईल.

दरम्यान डीआरएस बाबतस देखील एक नवीन नियम तयार केला आहे. यामध्ये प्रत्येक डावात दोनदा डिसीजन रिव्यू सिस्टमचा वापर करता येणार आहे. या अगोदर असे नव्हते. याचा अर्थ एका संघाला क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीमध्ये एकूण चार डीआरएस असतील ( Four DRS available ). त्यामुळे संघाना अजूनच फायदा होणार आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, बोर्डाने म्हटले आहे की, जर कोणत्याही संघात प्लेइंग इलेव्हन उपलब्ध नसेल, तर त्या संघाचा सामना पुन्हा आयोजित करण्याचे वेळापत्रक ठरवले जाईल. त्यानंतरही जुळवाजुळव न झाल्यास हे प्रकरण तांत्रिक समितीकडे पाठवले जाईल. तिथे जो काही निर्णय होईल, तो पाळावाच लागेल. पुर्वीचा नियम असा होता की, जर सामना बदलूनही सामना पूर्ण झाला नाही. तर मागे असलेल्या संघाला पराभूत म्हणून त्याच्या विरोधी संघाला दोन गुण ( Two points to the opposing team ) दिले जात होते.

तसेच या व्यतिरिक्त बोर्डाने सांगितले की, प्लेऑफ किंवा फायनल सामन्यात टाय सामन्याला सामोरे जावे लागले आणि त्यानंतर सुपर होऊन अजून एक सुपर होऊन सुद्धा निर्णय लागला नाही. तर त्या दोन संघाची साखळी फेरीतील कामगीरी लक्षात घेतली जाईल. त्याच्यामध्ये जो अव्वल असेल त्याला विजेता घोषित केले जाईल. तसेच आयपीएल 2022 ( IPL 2022 ) ही स्पर्धा मुंबई आणि पुणे येथील चार स्टेडियमवर खेळली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.