ETV Bharat / sports

IPL 2022 LSG vs DC : आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपरजायंट्स आमनेसामने; वार्नर-स्टायनिस खेळण्याची शक्यता

author img

By

Published : Apr 7, 2022, 4:36 PM IST

LSG vs DC
LSG vs DC

आयपीएल 2022 च्या हंगामातील पंधरावा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Lucknow Super Giants vs Delhi Capitals ) संघात होणार आहे. हा सामना गुरुवारी (7 एप्रिल) डी. वाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाणार आहे.

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील पंधरावा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Lucknow Super Giants vs Delhi Capitals ) संघात होणार आहे. हा सामना गुरुवारी (7 एप्रिल) डी. वाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाणार आहे. या दोन्ही संघापैकी दिल्ली संघाचे आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. त्यापैकी एक सामना जिंकला आहे, तर एक सामना गमावला आहे. तसेच लखनौ सुपरजायंट्स संघाचे तीन सामने झाले आहेत, त्यापैकी एका सामन्यात पराभव, तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ ( Delhi Capitals Team ) सध्या गुणतालिकेत चार गुणांसह सातव्या स्थानी आहे. त्याचबरोबर लखनौ सुपरजायंट्स चार गुणांसह पाचव्या स्थानी विराजमान आहेत. टीम सेफर्टच्या जागी आजच्या सामन्यासाठी वॉर्नरचा दिल्ली कॅपिटल्स संघात समावेश केला जाईल. तर स्टॉइनिस लखनौ संघात अँड्र्यू टाय किंवा एविन लुईसची ( Evin Lewis ) जागा घेईल. सध्या तो टायऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्याची शक्यता जास्त आहे. दोन्ही संघांची गोलंदाजी चिंतेचे कारण ठरली असली, तरी गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली ( Gautam Gambhir ) सुपर जायंट्स संघाने छाप पाडली आहे.

जेसन होल्डरच्या समावेशामुळे लखनौचा संघ अधिक मजबूत झाला असून पृथ्वी शॉसह वॉर्नर आक्रमक सुरुवात करून देईल, अशी आशा दिल्ली संघाला असेल. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad Against )ळी खेळणाऱ्या लखनऊचा कर्णधार राहुलला क्विंटन डी कॉकने सुपर किंग्जविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी असे वाटते. लखनौच्या गोलंदाजांना मात्र दिल्लीच्या फलंदाजीवर अंकुश ठेवावा लागणार आहे, जो वॉर्नरच्या उपस्थितीमुळे आणखी मजबूत होईल. कर्णधार पंत आणि पृथ्वी यांच्याकडूनही संघाला मोठ्या खेळीची प्रतिक्षा आहे.

मनीष पांडेची फलंदाजी ही संघासाठी चिंतेची बाब आहे. गंभीर आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी ओळखला जातो आणि अशा परिस्थितीत, प्लेइंग इलेव्हनमध्ये पांड्याची जागा कायम राहू शकते. तसेच, भारतीय फलंदाजीच्या पर्यायांचा विचार करता लखनौची बेंच स्ट्रेंथ मजबूत ( Lucknow Bench Strength not strong ) नाही हे नाकारता येत नाही. संघात मनन वोहरा ( Manan Vohra ) आणि उत्तर प्रदेशचा मर्यादित षटकांचा कर्णधार करण शर्मा आहे. आयपीएलमध्ये एक दशक घालवूनही वोहरा स्वत:ला प्रस्थापित करू शकलेला नाही. करणला अजून खूप काही शिकायचे आहे.

लखनऊ सुपर जायंट्स : लोकेश राहुल (कर्णधार), मनन वोहरा, एविन लुईस, मनीष पांडे, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, दुष्मंता चमिरा, शाहबाज नदीम, मोहसीन खान, मयंक यादव, अंकित राजपूत, आवेश खान, अँड्र्यू टाय, मार्कस स्टॉइनिस, काइल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या आणि जेसन होल्डर.

दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), अश्विन हेब्बर, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल, अॅनरिक नोर्किया, चेतन साकारिया, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कमलेश नॉर्किया , ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, केएस भरत आणि टिम सेफर्ट.

हेही वाचा - KKR vs MI IPL 2022 : सलग तिसरा पराभव! कोलकाताचा मुंबईवर 5 गडी राखून विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.