ETV Bharat / sports

IPL 2022 GT vs RCB : गुजरात टायटन्सच्या 'या' खेळाडूवर आयपीएल अधिकार्‍यांनी केली मोठी कारवाई

author img

By

Published : May 20, 2022, 3:35 PM IST

GT vs RCB
GT vs RCB

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यादरम्यान इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुजरात टायटन्सचा एका खेळाडूला फटकारले गेले. लेव्हल एकचा गुन्हा आणि शिक्षा त्यानी स्वीकारली. आचारसंहितेच्या लेव्हल 1 भंगासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असतो.

मुंबई: गुरुवारी आयपीएल 2022 मधील 67 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore ) संघात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने गुजरातवर 8 विकेट्सने मात केली. त्याचबरोबर यानंतर गुजरात टायटन्सचा आघाडीचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडवर कारवाई ( Action on Matthew Wade ) करण्यात आली आहे. सामन्यादरम्यान वेडने बाद झाल्यानंतर राग व्यक्त केला होता. त्याने रागाच्या भरात ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर आपले हेल्मेट आणि बॅट जमिनीवर आपटले आणि त्यामुळेच आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे.

आरसीबीसाठी ग्लेन मॅक्सवेलने डावातील सहावे षटक घेऊन आला होता, तेव्हा दुसरा चेंडू वेडच्या पायावर जाऊन लागला. ज्यामुळे पंचांनी त्याला बाद घोषित केले. त्यानंतर त्यांनी तातडीने डीआरएस घेण्याचे ठरवले. मात्र, चेंडू त्याच्या बॅटला किंवा ग्लोव्हजला स्पर्श करत नव्हता आणि विकेटही रेषेच्या बाहेर होती. चेंडू विकेटवर (स्टंम्पवर) आदळत होता आणि अंपायरच्या कॉलच्या आधारे त्याला बाद देण्यात आले. वेडने वैयक्तिक 16 धावा केल्या होत्या.

आऊट झाल्यानंतर तो निराश दिसला आणि त्याने हेल्मेट ड्रेसिंग रूममध्ये फेकले. यानंतर त्याने तीन ते चार वेळा इकडे तिकडे बॅट मारली. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंचांच्या निर्णयाने वेड नाराज झाला.

मॅथ्यू वेडवर कारवाई -

त्याच्या या वागणुकीमुळे आयपीएल अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. आयपीएलच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे, आयपीएलची आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मॅथ्यू वेडला शिक्षा झाली आहे. मॅथ्यू वेडने कलम 2.5 अन्वये लेव्हल 1 चा गुन्हा केला असून त्यांनी ते माव्य केला आहे. या आयपीएल हंगामात मॅथ्यू वेडची ( Wicketkeeper Matthew Wade ) कामगिरी चांगली राहिलेली नाही. एकूणच, त्याने या मोसमात 8 सामने खेळले आहेत आणि 14.25 च्या साध्या सरासरीने आणि 116.33 च्या स्ट्राइक रेटने फक्त 114 धावा केल्या आहेत.

हेही वाचा - RCB Vs GT: कोहलीच्या पुनरागमनामुळे बंगळुरूचा 'विराट' विजय, प्लेऑफच्या आशा अबाधित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.