ETV Bharat / sports

IPL 2022 2nd Qualifier RR vs RCB : नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

author img

By

Published : May 27, 2022, 7:14 PM IST

2nd Qualifier RR vs RCB
2nd Qualifier RR vs RCB

आयपीएल 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये ( IPL 2022 2nd Qualifier ) राजस्थान रॉयल्स ( RR ) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( RCB ) यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवारी (27 मे) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे.

अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग 2022चा रोमांचक हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे, कारण आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील शेवटचे दोन सामने उरले आहेत. त्यापैकी एक म्हणजे दुसरा क्वालिफायर ( IPL 2022 2nd Qualifier ) सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( RR vs RCB ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. या सामन्याची नाणेफेक दोन्ही संघाचे कर्णधार संजू सॅमसन आणि फाफ डु प्लेसिस यांच्यात पार पडली आहे. नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागीन सामन्यातील दोन्ही संघ कायम आहेत.

क्वालिफायर-1 मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभूत झाल्यानंतर, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals ) आज आयपीएल 2022 च्या क्वालिफायर-2 मध्ये फाफ डू प्लेसिसच्या ( Faf du Plessis ) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ( Royal Challengers Bangalore ) कडवे आव्हान आहे. चालू आयपीएल हंगामात राजस्थान एक मजबूत संघ म्हणून पुढे आला आहे. त्यांनी स्पर्धेच्या साखळी टप्प्यात अत्यंत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांनी पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले. तथापि, क्वालिफायर 1 मध्ये गुजरातविरुद्ध रॉयल्सने चांगली कामगिरी केली नाही, विशेषत: दबावाच्या परिस्थितीत त्यांचे गोलंदाज कामगिरी करू शकले नाहीत. आता त्यांचा सामना आरसीबीशी आहे, जे स्पर्धेत योग्य वेळी पात्र ठरण्यात यशस्वी ठरले होते.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीद कृष्णा, ओबेद मॅककॉय आणि युझवेंद्र चहल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड आणि मोहम्मद सिराज.

हेही वाचा - Kidambi Srikanth Interview : स्वतःवर विश्वास ठेवा आणि शेवटपर्यंत लढा - थॉमस कप विजेत्या श्रीकांतचा सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.