ETV Bharat / sports

IPL 2021: मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

author img

By

Published : Sep 13, 2021, 10:05 PM IST

IPL 2021: Unfortunate we ended up in IPL early, hopefully we can maintain strong, bio-secure environment: Virat Kohli
IPL 2021: मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

आयपीएल 2021 च्या हंगामाला 10 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी बंगळुरू रॉयल्स संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलविषयी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्याने, हे आयपीएल शानदार होईल, असे म्हटलं आहे.

दुबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. हे निराशजनक राहिलं, आम्ही शेड्यूलच्या आधी यूएईमध्ये पोहोचलो. पण ज्या पद्धतीने कोरोना विषाणूचा प्रभाव दिसत आहे. ते पाहता परिस्थिती कठिण आहे. कधी काहीही होऊ शकतो, असे विराट कोहलीने म्हटलं आहे.

विराट कोहली बंगळुरू रॉयल्सच्या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलताना म्हणाला की, यूएईमध्ये आम्ही चांगलं, मजबूत तसेच सुरक्षित वातावरण राखण्यात यशस्वी होऊ. हे आयपीएल शानदार होईल. हा एक रोमांचक प्रवास होऊ पाहत आहे. ही बाब बंगळुरू रॉयल्स आणि टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघासाठी महत्वपूर्ण आहे.

दरम्यान, भारतीय संघाचे ज्यूनियर फिजिओ योगेश पारमार कोरोनाबाधित आढळले. तेव्हा भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना नाणेफेकीच्या काही तास आधी रद्द करण्यात आला. भारतीय संघाने हा सामना खेळण्यास नकार दिला. यानंतर भारतीय खेळाडू आयपीएल 2021 चा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी रवाना झाले.

बंगळुरू रॉयल्सचा पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी

आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामाला 19 सप्टेंबर पासून सुरूवात होणार आहे. आरसीबी या स्पर्धेत आपल्या अभियानाला 20 सप्टेंबरपासून करेल. त्यांचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणार आहे. पहिला सत्रात विराट कोहलीचा आरसीबी संघ गुणतालिकेत 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा - IPL 2021 : यूएईत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट धोकादायक ठरतील, दिग्गजाची भविष्यवाणी

हेही वाचा - जसप्रीत बुमराहला मागे टाकत जो रूटने जिंकला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.