IPL 2021 : ऋतुराजची झुंजार खेळी; मुंबई समोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान

author img

By

Published : Sep 19, 2021, 9:59 PM IST

Updated : Sep 19, 2021, 10:11 PM IST

IPL 2021 : CSK gives target of 157 runs to Mumbai Indians

ऋतुराज गायकवाडच्या सर्वाधिक नाबाद 88 धावांच्या योगदानाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 156 धावा केल्या आणि मुंबई इंडियन्सला विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य मिळाले. उभय संघातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जात आहे.

दुबई - ऋतुराज गायकवाडच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सलामीला आलेल्या ऋतुराजने 58 चेंडूचा सामना करत धावा नाबाद 88 केल्या. यामध्ये 4 षटकार आणि 9 चौकार यांचा समावेश आहे. ऋतुराजला रविंद्र जडेजाने 26 धावा करत चांगली साथ दिली.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. पहिल्याच षटकात सलामीवीर फाफ डू प्लेसिस भोपाळाही न फोडता झेलबाद झाला. त्याला बोल्टने मिल्नेकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर मोईन अली देखील शुन्यावर बाद झाला. त्याची विकेट मिल्ने याने घेतली. तर झेल सौरभ तिवारीने घेतला. यानंतर सुरेश रैना अवघ्या चार धावा करुन तंबूत परतला. तेव्हा महेंद्रसिंग धोनीकडून चेन्नईच्या संघाला खूप अपेक्षा होती. मात्र, धोनी देखील वैयक्तिक तीन धावांवर बाद झाला. त्याची शिकार मिल्ने याने केली.

ऋतुराज गायकवाडने एक बाजू लावून धरली होती. धोनी बाद झाल्यानंतर आलेल्या रविंद्र जडेजाने त्याला चांगली साथ दिली. या जोडीने चांगली भागीदारी करत धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. रविंद्र जडेजा 26 धावा करून झेलबाद झाला. तेव्ह मैदानात आलेल्या ड्वेन ब्राव्होने आक्रमक फटके मारले. त्याने 3 षटकार लगावत 23 धावा केल्या. शार्दुल ठाकूरने 1 धाव केली. मुंबईकडून बोल्ट, बुमराह आणि मिल्ने यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

हेही वाचा - आयपीएल 2021 ला सुरूवात होण्याआधी पाहा रिप्लेसमेंट खेळाडूंची यादी

हेही वाचा - IPL 2021: लसिथ मलिंगाने चार वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्ससोबतचा अनुभव केला शेअर

Last Updated :Sep 19, 2021, 10:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.