नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी केएल राहुल उपकर्णधार म्हणून दिसणार आहे.
उपकर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे केएलला ही संधी मिळाली. रोहित हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर आहे आणि तो एनसीएमध्ये रिहॅबच्या प्रक्रियेतून जात आहे.
या घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी वृत्त संस्थेला पुष्टी दिली की, राहुल हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीचा उपकर्णधार असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी पुष्टी केली की रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
"टीम इंडियाचा कसोटी उप-कर्णधार रोहित शर्माला मुंबईतील सराव सत्रादरम्यान डाव्या हाताला दुखापत झाली," असे बीसीसीआयने अधिकृत पत्रकात म्हटले आहे. त्याला या मालिकेतून वगळण्यात आले असले तरी, रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचाल कसोटी संघात खेळणार आहे.
हेही वाचा - Kapil Dev's Advice To Virat : कपिल देवचा विराट कोहलीला सल्ला, म्हणाला, "तू देशाचा विचार कर"