ETV Bharat / sports

Happy Holi 2022 : होळी निमित्त क्रिकेटपटूंकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

author img

By

Published : Mar 18, 2022, 3:48 PM IST

आज देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या होळीच्या सणानिमित्ताने क्रिकेटपटू ( Happy Holi from Cricketers ) विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह क्रीडा जगतातील अनेक प्रसिद्ध खेळाडूंनी आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy Holi
Happy Holi

हैदराबाद : आज देशभरात सर्वत्र होळीचा सण साजरा केला जात आहे. मागील दोन वर्षात कोरोना महामारीमुळे लोकांना होळीचा सण साजरा करता आला नव्हता. कारण सरकारने बऱ्याच गोष्टींवर निर्बंध घातले होते. त्यामुळे हा सण आणि इतर सण साजरा करता आला नव्हता. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा ( Celebrate Holi ) केला जात आहे. तसेच या होळीच्या सणानिमित्ताने अनेक क्रिकेपटूने आपल्या चाहत्यांना आणि देशबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एकीकडे कुटुंबातील लोक मिळून होळीचा सण साजरा करत आहेत. त्याचबरोबर सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. यामध्ये आता विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह क्रीडा जगतातील अनेक प्रसिद्ध खेळाडूंनी आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने ( Wicketkeeper Rishabh Pant ) आपल्या चाहत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आपल्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या खेळाडूंसोबत होळीचा सण साजरा केला आहे. त्याचबरोबर आपल्या संघ सहकाऱ्यांच्या सोबत रंगात रंगलेल्याचा फोटो पोस्ट केला आहे.

तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ( Master blaster Sachin Tendulkar ) देखील ट्विटरवर एक फोटो पोस्ट करत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने ( Former captain Virat Kohli ) देखील आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना एक फोटो ट्विट केला आहे.

होळीच्या निमित्ताने भारतीय कर्णधार रोहित शर्माने ( Captain Rohit Sharma ) पत्नीसोबतचा एक व्हिडिओ जारी करून सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ रोहित शर्माने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण ( Former cricketer VVS Laxman ) यांनी होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहले आहे, होळीचे रंग तुमच्या आयुष्यात शांती, आनंद, प्रेम घेऊन येवोत. तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

ऑस्ट्रेल्याचा स्फोटक फलंदाज डेविड वार्नरने ( Explosive batsman David Warner ) देखील होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने ( All-rounder Ravindra Jadeja ) देखील ट्विरच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Wish you all a very Happy and safe Holi. Let the colors of this festival spread love and happiness. Hope you all enjoy & treasure some joyful moments with friends and family. 😊

    — Ravindrasinh jadeja (@imjadeja) March 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.