ETV Bharat / sports

Womens ODI World Cup 2025 : भारत 2025 मध्ये महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार

author img

By

Published : Jul 27, 2022, 12:07 PM IST

Womens team
भारतीय महिला संघ

भारत 2025 मध्ये महिलांच्या वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार ( India host Womens ODI World Cup ) आहे. आयसीसीच्या वार्षिक अधिवेशनादरम्यान बीसीसीआयने या मेगा-टूर्नामेंटसाठी बोली जिंकली आहे.

नवी दिल्ली: 2025 मध्ये भारत महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार ( India Host Womens ODI World Cup 2025 )आहे. कारण मंगळवारी बर्मिंगहॅम येथे संपन्न झालेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत बीसीसीआयने मेगा-टूर्नामेंटसाठी बोली जिंकली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( International Cricket Council ) या महत्त्वाकांक्षी स्पर्धेचे देश एका दशकाहून अधिक काळानंतर पुन्हा यजमानपद भूषवणार आहे.

  • 𝗘𝘅𝗰𝗶𝘁𝗲𝗺𝗲𝗻𝘁 𝗟𝗲𝘃𝗲𝗹𝘀 🆙!

    India to host the 2025 ICC Women’s World Cup. 👏 👏

    The 50-over World Cup returns to India after 2013. 👍 👍 pic.twitter.com/ev6zXpX2gW

    — BCCI Women (@BCCIWomen) July 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महिलांचा एकदिवसीय विश्वचषक शेवटचा 2013 मध्ये भारतात आयोजित केला गेला होता. या विश्वचषकात मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिजचा 114 धावांनी पराभव करून चॅम्पियन बनला होता. इतर तीन आयसीसी महिला स्पर्धांच्या यजमानांचीही आज घोषणा करण्यात आली. 2024 टी-ट्वेंटी विश्वचषक बांगलादेशमध्ये होणार ( T20 World Cup 2024 in Bangladesh ) आहे. 2026 चा टी-ट्वेंटी विश्वचषक इंग्लंडमध्ये ( T20 World Cup 2026 in England ) होणार आहे.

श्रीलंका 2027 मध्ये टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार ( T20 World Cup 2027 in Sri Lanka ) आहे. आयसीसीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, "आम्ही आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चे आयोजन करण्यास उत्सुक होतो. आता त्याचे यजमानपद मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे."

हेही वाचा - Commonwealth Games 2022 : गोंधळानंतर लोव्हलिना बोरगोहेनच्या प्रशिक्षक संध्या गुरुंगला मिळाली मान्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.