ETV Bharat / sports

ICC T20 Rankings : क्रमवारीत भारताच्या क्रिकेटपटूंनी घेतली मोठी झेप; कोण, कोणत्या क्रमांकावर आहे, घ्या जाणून

author img

By

Published : Aug 10, 2022, 6:12 PM IST

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अजूनही T20 मध्ये नंबर 1 फलंदाज आहे. त्याच वेळी, बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी T20 खेळाडूंच्या क्रमवारीत ( ICC T20 rankings ) भारताच्या अनेक स्टार्सनी मोठी झेप घेतली आहे. अलीकडेच, भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध पार पडलेल्या T20I मालिकेत 4-1 ने विजय मिळवला. तसेच फलंदाजांच्या क्रमवारीत त्यांचे अनेक सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू बाबरशी स्पर्धा करत आहेत.

India cricketers
भारतीय क्रिकेटर

दुबई: श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे आयसीसीच्या अव्वल खेळाडूंच्या क्रमवारीत आघाडीवर ( India cricketers in ICC T20 rankings ) आहेत. फ्लोरिडा येथे मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात अय्यरने प्रभावी अर्धशतक ठोकले. त्यामुले या फलंदाजाने क्रमवारीत एकूण सहा स्थानांनी झेप घेत 19व्या स्थानावर पटकावले. पंतने चौथ्या सामन्यात 44 धावा करत 115 धावांसह दुसरा आघाडीचा धावा करणारा खेळाडू म्हणून मालिका पूर्ण केली. त्यामुळे डावखुरा फलंदाज सात स्थानांनी 59व्या स्थानावर पोहोचला आहे.

उदयोन्मुख सलामीवीर सूर्यकुमार यादवने ( Opener Suryakumar Yadav ) या मालिकेत सर्वाधिक 135 धावा केल्या होत्या, परंतु बाबरला मागे टाकण्याची संधी गमावली. कारण त्याला अंतिम सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. टी-20 क्रमवारीत यादव दुसऱ्या स्थानावर कायम आहे. या महिन्याच्या अखेरीस दुबई येथे होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामन्यापूर्वी बाबर आता 13 रेटिंग गुणांनी आघाडीवर ( Babar Azam tops in T20 rankings ) आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताच्या गोलंदाजांनीही आश्चर्यकारक कामगिरी केली, ज्यामुळे त्यांना गोलंदाजी क्रमवारीत मदत झाली.

युवा फिरकीपटू रवी बिश्नोई ( Young spinner Ravi Bishnoi ) या मालिकेदरम्यान आठ विकेट्ससह भारताचा आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज होता. 21 वर्षीय रवी गोलंदाजांच्या यादीत 50 स्थानांनी पुढे 44व्या स्थानावर पोहोचला आहे. सहकारी आवेश खान, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनीही आघाडी घेतली, तर अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान अवघ्या तीन बळींनंतर नवव्या स्थानावर घसरला.

अलीकडेच, दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडवर 2-0 ने जिंकलेल्या मालिकेने त्यांच्या खेळाडूंना T20 क्रमवारीतही पुढे नेले. फॉर्मात असलेली सलामीवीर रीझा हेंड्रिक्स ( Opener Reeza Hendricks ) फलंदाजांच्या यादीत दोन स्थानांनी 13व्या स्थानावर आला आहे. फिरकीपटू केशव महाराज गोलंदाजांच्या क्रमवारीत 10 स्थानांनी 18व्या स्थानावर पोहोचला आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा सहकारी ड्वेन प्रिटोरियसने अष्टपैलूंच्या यादीत सात स्थानांनी झेप घेत 26व्या स्थानावर कब्जा केला आहे.

झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर एकदिवसीय क्रमवारीत काही किरकोळ बदल करण्यात झाले आहेत. फॉर्ममध्ये असलेला अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा अलीकडच्या काळात झिम्बाब्वेसाठी यशस्वी फलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे. अनुभवी 36 वर्षीय रझाने नवीन एकदिवसीय क्रमवारीत चढाई केली आहे.

रझाने बांगलादेशविरुद्ध सलग दोन नाबाद शतके झळकावली आहेत. त्याने फलंदाजांच्या क्रमवारीत 10 स्थानांनी झेप घेतली असून तो 29व्या स्थानावर पोहोचला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने सात स्थानांनी झेप घेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा - Ind Vs Wi 5th T20 : भारतीय चाहत्यांनी 'ऊ अंटावा' गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.