ETV Bharat / sports

Shubman Gill Record : न्यूझीलंडविरुद्ध शुभमन गिलने केली बाबर आझमच्या 'या' विक्रमाची बरोबरी

author img

By

Published : Jan 25, 2023, 8:56 AM IST

गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत एकूण 360 धावा केल्या आहेत. यासाठी त्याची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. या बाबतीत त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमची बरोबरी केली आहे.

Shubman Gill
शुभमन गिल

इंदूर : भारताचा सलामीवीर शुभमन गिलने मंगळवारी होळकर क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कारकीर्दीतील चौथे एकदिवसीय शतक झळकावले. यासह त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी केली. गिलने अवघ्या 78 चेंडूत 112 धावा करत मालिकेतील आपले दुसरे शतक पूर्ण केले. यापूर्वी हैदराबादमध्ये या युवा सलामीवीराने 208 धावा केल्या होत्या. याबरोबरच तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला.

बाबरच्या विक्रमाची बरोबरी : गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत एकूण 360 धावा केल्या आहेत. यासाठी त्याची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. या बाबतीत त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमची बरोबरी केली आहे. 2016 मध्ये बाबरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत एकूण 360 धावा केल्या होत्या. आता गिलने बाबर आझमच्या या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. याशिवाय बांगलादेशच्या इमरुल कायसने 2018 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत 349 धावा केल्या होत्या.

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा : बाबर आझम, 360, विरुद्ध वेस्ट इंडीज, 2016 , शुभमन गिल, 360 विरुद्ध न्यूझीलंड, 2023, इमरुल कायस, 349, विरुद्ध झिम्बाब्वे 2018. शुभमन गिल याने या मालिकेतील पहिल्या सामन्यात 208 धावा केल्या होत्या. त्यानंतर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्याने वयाच्या 23 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणारे सर्वात तरुण फलंदाज पुढीलप्रमाणे - शुभमन गिल विरुद्ध न्यूझीलंड, 23 वर्षे 132 दिवस, 2023, इशान किशन विरुद्ध बांगलादेश, चटगाव, 24 वर्षे 145 दिवस, 2022, रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बेंगळुरू, 26 वर्षे 186 दिवस, 2013

भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा : उजव्या हाताचा सलामीवीर शुभमन गिलने न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वात जलद 1000 एकदिवसीय धावा करणारा भारतीय ठरला होता. 23 वर्षीय गिलने 19व्या वनडे डावात 1000 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी भारताकडून विराट कोहली आणि शिखर धवन यांनी 24-24 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. पाकिस्तानचा फखर जमाननंतर सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करणारा शुभमन गिल हा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानने 18 एकदिवसीय डावात ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा : India ODI Ranking : एकदिवसीय क्रमवारीत भारताची अव्वल स्थानावर झेप, न्यूझीलंडची घसरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.