IND VS ENG: रविंद्र जडेजाला दुखापत, भारतीय संघाच्या अडचणीत वाढ

author img

By

Published : Aug 29, 2021, 4:06 PM IST

IND VS ENG : Ravindra Jadeja taken to hospital for precautionary scan for suspected knee injury

लीड्स कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रविंद्र जडेजाचा गुडघ्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

लीड्स - भारतीय क्रिकेट संघाचा लीड्स कसोटी सामन्यात इंग्लंडने एक डाव 76 धावांनी दारूण पराभव केला. या विजयासह इंग्लंडने पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. पराभवानंतर आता भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

रविंद्र जडेजाने सोशल मीडियावर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. यात तो रुग्णालयात असल्याचे पाहायला मिळत आहे. जडेजा या फोटोत रुग्णालयात दिले जाणारे कपडे परिधान केलेला पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रविंद्र जडेजाला स्कॅन करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

लीड्स कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रविंद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो काही वेळ मैदानाबाहेर देखील गेला होता. पण तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने 5 चौकार आणि 1 षटकारासह 30 धावांची खेळी केली. सामना संपल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

रविंद्र जडेजाच्या गुडघ्याचा स्कॅन करण्यात आल्याचे समजते. पण अद्याप त्याचा रिपोर्ट आलेला नाही. रिपोर्ट आल्यानंतर जडेजाची दुखापत किती गंभीर आहे, हे समोर येईल.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यात भारताने 1 तर इंग्लंडने 1 सामना जिंकला आहे. तर एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला. उभय संघातील चौथ्या कसोटी सामन्याला 2 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.

हेही वाचा - IND vs ENG 3rd test : भारताचा दारूण पराभव, इंग्लंड 1 डाव 76 धावांनी विजयी

हेही वाचा - सुर्यकुमार यादवला अंतिम संघात स्थान द्या, दिलीप वेंगसकरचा सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.