ETV Bharat / sports

Ind vs Eng : पाचवा कसोटी सामना रद्द झाल्याने टीम इंडियावर भडकला जेम्स अँडरसन, म्हणाला...

author img

By

Published : Sep 12, 2021, 8:28 PM IST

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना रद्द करण्यात आला. यावरून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन नाराज झाला आहे. दरम्यान, उभय संघातील सामना भारतीय संघाचे ज्यूनियर फिजिओ योगेश परमार कोरोनाबाधित आढळल्याने रद्द करण्यात आला.

england-fast-bowler-james-anderson-showed-his-anger-after-manchester-old-trafford-5th-test-cancelled-between-ind-vs-eng-due-to-covid-ecb-bcci
Ind vs Eng : पाचवा कसोटी सामना रद्द झाल्याने टीम इंडियावर भडकला जेम्स अँडरसन, म्हणाला...

लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यातीत पाचवा आणि अखेरचा निर्णायक कसोटी सामना अचानक रद्द करण्यात आला. नाणेफेकीच्या 90 मिनिटाआधी भारतीय संघाने सामना खेळण्यास नकार दिला. यामुळे इंग्लंड क्रिकेटर विराट कोहलीच्या संघावर नाराज आहेत. अनेक माजी खेळाडूंनी भारतीय संघावर टीका केली आहे. यातील बहुतांश खेळाडूंनी उभय संघातील कसोटी सामना रद्द होण्यास आयपीएलला जबाबदार धरले आहे. या नाराज खेळाडूंमध्ये आता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याची भर पडली आहे.

काय म्हणाला अँडरसन

जेम्स अँडरसन याने इन्स्टाग्राम पोस्ट लिहीत आपली नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या उन्हाळी हंगामाचा अशाप्रकारे शेवट होणे हे लाजिरवाणे आहे. मी लंकाशायर क्रिकेटसाठी निराश आहे. तसेच मी त्या फॅन्ससाठी देखील नाराज आहे ज्यांनी तिकिट, ट्रेन, हॉटेलसाठी पैसे दिले होते. दोन्ही संघाचे पाठिराखे या मालिकेचा शेवट पाहून इच्छित होते. मला आशा की, हा सामना कधीतरी पुन्हा खेळला जाईल. माझे हे होम ग्राउंड असून मला याच्यावर खूप प्रेम आहे. याच मैदानावर मला आणखी एक आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास मिळेल.

दरम्यान जेम्स अँडरसन याने त्याच्या इन्स्टाग्रामवर ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानाचा फोटो शेअर केला आहे. जेम्स अँडरसन याने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 सामन्यात 15 गडी बाद केले. भारतीय संघाचे ज्यूनियर फिजिओ योगेश पारमार यांना कोरोनाची लागण झाली. यामुळे भारतीय संघाने मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफोर्ड येथील सामना खेळण्यास नकार दिला. बीसीसीआय या सामन्याचे पुन्हा आयोजन करण्याच्या प्रयत्नात आहे.

हेही वाचा - IPL 2021 : शिखर धवन म्हणाला, 'या' खेळाडूची वापसी झाल्याने आमचा संघ आणखी बळकट झाला

हेही वाचा - US Open 2021 : वयाच्या 18व्या वर्षी जिंकलं ग्रँडस्लॅम; ब्रिटनच्या एमा राडुकानूची ऐतिहासिक कामगिरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.