ETV Bharat / sports

IND vs ENG 5th Test 3rd Day : चेतेश्वर पुजाराच्या नाबाद अर्धशतकाने भारताकडे 257 धावांची आघाडी

author img

By

Published : Jul 4, 2022, 12:07 PM IST

तिसर्‍या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सिराजने (66 धावांत 4 विकेट) भारतीय संघाला कमबॅक केले. कर्णधार जसप्रीत बुमराहने 68 धावांत तीन बळी घेतले. यावेळी पहिल्या डावात ऋषभ पंत (30) धावा करून चेतेश्वर पुजारासह ( Cheteshwar Pujara ) खेळत होता. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 50 धावांची नाबाद भागीदारी केली.

Cheteshwar Pujara
चेतेश्वर पुजारा

बर्मिंगहॅम: पहिल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने रविवारी इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी 257 धावांची आघाडी ( Pujara half-century India 257-run lead ) घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 45 षटकांत 3 बाद 125 अशी होती. यावेळी ऋषभ पंत (30) धावा करून पुजारासह खेळत होता. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 50 धावांची अखंड भागीदारी केली. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात करणाऱ्या पुजाराने एक टोक धरले आणि दिवसाच्या शेवटच्या षटकात जो रूटविरुद्ध धाव घेत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 33वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 139 चेंडूंत चार चौकार लगावत नाबाद 50 धावा केल्या आहेत.

संघात परतलेल्या या फलंदाजाने पंतच्या आधी हनुमा विहारी (11) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 37 आणि माजी कर्णधार विराट कोहली (20) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी केली. मैदानावर वेळ घालवल्यानंतर कोहली पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ( Virat Kohli fails again ) ठरला. त्याने 40 चेंडूंच्या खेळीत चार शानदार चौकार मारले आणि तो लयीत दिसत होता, पण कर्णधार बेन स्टोक्सने (22 धावांत 1 बळी) त्याला बाद केले.

तत्पूर्वी, जॉनी बेअरस्टोच्या शतकाच्या ( Johnny Bairstow century ) जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 284 धावा केल्या होत्या. दिवसाचे सुरुवातीचे सत्र संपूर्णपणे बेअरस्टोच्या नावावर होते (140 चेंडूत 106 धावा) दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान संघर्ष करणाऱ्या बेअरस्टोला तिसऱ्या दिवशी सुरुवातीच्या 20 मिनिटांच्या खेळादरम्यान अडचणीचा सामना करावा लागला. यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने बेअरस्टोच्या फलंदाजीवर काही प्रतिक्रिया दिल्या आणि इंग्लंडच्या फलंदाजाने आपली खेळण्याची शैली बदलली. बेअरस्टोने मिड-ऑफ आणि ओव्हर मिड-विकेटमधून काही चांगले चौकार मारले. त्याने मोहम्मद सिराज आणि शार्दुलविरुद्धही काही षटकार ठोकले.

मात्र, दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सिराजने (66 धावांत 4 बळी) भारतीय संघाचे पुनरागमन केले, तेथेच मोहम्मद शमीने (78 धावांत 2 बळी) निर्माण केलेल्या दडपणाचा फायदा त्याला झाला. बेअरस्टोने शार्दुल ठाकूर (48 धावांत एक विकेट) विरुद्ध चौकार ठोकले आणि कारकिर्दीतील 11 व्या आणि सलग तिसऱ्या सामन्यात आपले कसोटी शतक पूर्ण केले. यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने (68 धावांत 3 बळी) दमदार गोलंदाजी करत त्याच्यावर दबाव आणला. त्यामुळे 14 चौकार आणि 2 षटकार मारणाऱ्या बेअरस्टोला पुढच्या 20 चेंडूत केवळ 6 धावा करता आल्या.

दबाव कमी करण्यासाठी त्याने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कोहलीकडे स्लिपमध्ये झेलबाद केले. बेअरस्टो आणि सॅम बिलिंग्ज (36) यांची 92 धावांची भागीदारी मोडून काढल्यानंतर सिराजने 43 धावांच्या आत इंग्लंडच्या उर्वरित तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावात 132 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात जेम्स अँडरसनने (26 धावांत 1 बळी) शुबमन गिलला (4) बाद केले.

हेही वाचा - IND vs ENG 5th Test 3rd Day: इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांवर गुंडाळला, भारताकडे 132 धावांची आघाडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.