ETV Bharat / sports

IND vs BAN T20: भारताचा बांगलादेशवर 5 धावांनी 'विराट' विजय; कोहली ठरला सामनावीर

author img

By

Published : Nov 2, 2022, 1:46 PM IST

Updated : Nov 2, 2022, 6:54 PM IST

IND vs BAN T20 World Cup 2022
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

टी२० विश्वचषकात भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला गेला. या अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यानंतर उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे.

ॲडलेड - टी२० विश्वचषकात भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला गेला. या अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यानंतर उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार धावांचे लक्ष हे १६ षटकात १५१ करण्यात आले होते. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीला टी२० विश्वचषक २०२२ मध्ये दुसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

राहुलने सलग तीन सामन्यातील अपयश धुवून काढले - उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला अपयश आले. तो सुरुवातीपासूनच चाचपडत खेळताना दिसला. बाद होण्यापूर्वी त्याने ८ चेंडूवर २ धावा केल्या. या विश्वचषकात आतापर्यंत शांत असलेल्या केएल राहुलने या सामन्यात तुफान कामगिरी केली. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३२ चेंडूवर ५० धावा केल्या. केएल राहुलने थोडा वेळ घेत नंतर मोठे फटके मारण्यास सुरुवात केली त्याला विराट कोहली चांगली साथ मिळाली. राहुलने सलग तीन सामन्यातील अपयश धुवून काढत अर्धशतकी खेळी केली. मात्र अर्धशतकी खेळीनंतर शकिबने त्याला बाद केले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने १६ चेंडूत आक्रमक ३० धावांची खेळी करत आपले इरादे स्पष्ट केले होते.

पावसानंतर सुरू झालेल्या सामन्यात बांगलादेशचे फलंदाजांची कामगिरी : बांगलादेशने जोरदार सुरुवात करीत 7 ओव्हरमध्ये 66 धावा केल्या होत्या. तोपर्यंत बांगलादेशची एकही विकेट गेलेली नव्हती. दोन्ही संघासाठी विजय महत्त्वाचा असताना, बांगलादेशने चांगली सुरुवात केली होती. परंतु पावसानंतर सुरू झालेल्या सामन्यात बांगलादेशचे फलंदाज आक्रमक फलदांजीच्या नादात एकामोगामाग आऊट होत गेले. बांगलादेशला 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य असताना बांगलादेश फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करताना आपल्या विकेट गमावल्या.

भारताचा बांगलादेशवर निसटता विजय : शेवटपर्यंत चाललेल्या अटीतटीच्या लढतीत भारताने बांगलादेशवर निसटता विजय मिळवला. पावसामुळे बांगलादेशला वेगळे टार्गेट मिळाल्याने त्यांना वेगात धावा करणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी विकेटकडे लक्ष न देता आक्रमक फलंदाजीच्या नादात विकेट गमावल्याने हा सामना शेवटपर्यंत रंगतदार राहिला. अखेरच्या षटकात बांगलादेशला 20 धावांची गरज असताना अर्शदीपच्या शेवटच्या षटकात बांगलादेशच्या फलंदाजांनी उत्कंठा वाढवली होती. परंतु, अखेरच्या चेंडूत 7 धावा असताना, ते करण्यात नजमुल हुसैन शांतो आणि लिटेन दास अपयशी ठरले.

भारतीय संघाची कामगिरी : सुरुवातीला रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीने भारतीय धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एकाबाजूने विकेट पडल असताना विराटने सावध खेळी करीत भारतीय संघाच्या धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अखेरीस आलेल्या अश्विनने जोरदार फटकेबाजी करीत धावसंख्येचा वेग वाढवला.

दोन्ही संघांना विजयाची अपेक्षा : पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्धच्या विजयानंतर भारताची नजर तिसऱ्या विजयाकडे आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो पराभूत झाला होता. दुसरीकडे बांगलादेशने नेदरलँड आणि झिम्बाब्वेला हरवून चार गुण मिळवले आहेत. त्यांचाही दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11
बांगलादेश : नझमुल हुसेन शांतो, लिटन दास, शकीब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसेन, नुरुल हसन (विकेटकीपर), मोसाद्देक हुसेन, यासिर अली, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शोरफुल इस्लाम.

भारत: केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.

अॅडलेडमध्ये भारताचा विक्रम : अॅडलेडमधील ओव्हलवर भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला असून भारतीय क्रिकेट संघाने शानदार विजय मिळवला आहे. अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या एकमेव सामन्यात संघाचा कर्णधार विराट कोहलीने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि 55 चेंडूत 90 धावा केल्या. त्याच्या कर्णधार खेळीमुळे भारतीय संघाने 3 गडी गमावून 188 धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाला 189 धावांचे लक्ष्य दिले होते. या खेळीत कोहलीने 9 चौकार आणि 2 षटकार मारले.

खेळपट्टीचा अहवाल : या विश्वचषकात अॅडलेडमध्ये अद्याप एकही सामना झालेला नाही. येथील रात्रीच्या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी 170 धावा झाली आहे. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी येथे खेळलेला एकमेव टी-२० सामना जिंकला आहे. 2016 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 37 धावांनी पराभव केला होता.

Last Updated :Nov 2, 2022, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.