ETV Bharat / sports

अक्षरच्या फिरकीची कमाल, भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय; मालिकेत ३-१ ची विजयी आघाडी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 10:37 PM IST

Updated : Dec 1, 2023, 10:58 PM IST

Ind Vs Aus 4th T 20 match
Ind Vs Aus 4th T 20 match

Ind Vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी २० सामन्यात भारतानं २० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं निर्धारित २० षटकांत १७४-९ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ २० षटकांत १५४-७ धावाचं करू शकला. १६ धावा देऊन ३ बळी घेणार अक्षर पटेल सामनावीर ठरला.

रायपूर Ind Vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ टी २० सामन्यांच्या मालिकेतील ४ था टी २० सामना शुक्रवारी (१ डिसेंबर) झाला. रायपुरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अजेय बढत घेतली.

भारताची प्रथम फलंदाजी : ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारताची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी ५० धावांची सलामी दिली. जयस्वाल २८ चेंडूक ३७ धावा करून बाद झाला. तर ऋतुराजनं २८ चेंडूत ३२ धावांचं योगदान दिलं. अय्यर आणि सूर्यकुमार यादव या सामन्यात काही मोठी खेळी करू शकले नाही. ते अनुक्रमे ८ आणि १ धावा करून बाद झाले. त्यानंतर आलेल्या रिंकू सिंहनं २९ चेंडूत धुवांधार ४६ धावा केल्या. तर युवा जितेश शर्मानं फक्त १९ चेंडूत ३५ धावा ठोकल्या. अशाप्रकारे भारतानं निर्धारित २० षटकांत १७४-९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुईसनं ४० धावा देऊन ३ बळी घेतले.

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली : धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळत झाली. जोश फिलिप ८ धावा करून बाद झाला. ट्रॅव्हिस हेडनं १६ चेंडूत ३१ धावा ठोकल्या. तर बेन मॅकडरमॉटनं २२ चेंडूत १९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज मोठी खेळू करू शकला नाही. कर्णधार मॅथ्यू वेड २३ चेंडूत सर्वाधिक ३६ धावा करून नाबाद राहिला. भारताकडून अक्षर पटेलनं घातक गोलंदाजी केली. त्यानं १६ धावा देऊन ३ बळी घेतले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

भारत - यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान, मुकेश कुमार

ऑस्ट्रेलिया - जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), बेन द्वारशुईस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा

हेही वाचा :

  1. T20 विश्वचषकासाठी 20 संघ भिडणार; पुढील वर्षी होणार स्पर्धा, कशा पद्धतीनं होणार विश्वचषक ?
  2. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; तीन फॉरमॅटसाठी तीन कर्णधार, रोहित, विराटला विश्रांती
Last Updated :Dec 1, 2023, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.