ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापुर्वी टीम इंडियाला दुहेरी झटका; 'हे' दोन स्टार खेळाडू जखमी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 9:21 AM IST

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

Cricket World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियानं पहिलं 4 सामने जिंकले आहेत. भारतीय संघ आज धर्मशाळा इथं न्यूझीलंडविरुद्ध पाचवा सामना खेळणार आहे. मात्र त्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला दुहेरी धक्का बसलाय.

शिमला (धर्मशाळा) Cricket World Cup 2023 : टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या दुखापतीमुळं आधीच या सामन्यातून बाहेर पडलाय. त्यातच आता तुफानी फलंदाज सूर्यकुमार यादवलाही सरावादरम्यान दुखापत झाल्याची माहिती समोर आलीय. तसंच ईशान किशनलाही मधमाशीनं चावा घेतल्यामुळं त्याचीही प्रकृती बिघडल्याचं समोर आलंय. यामुळं भारतीय संघाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दुखापतीचं कारण काय : भारतीय फलंदाज सूर्या हा संघाचा थ्रो डाउन स्पेशालिस्ट रघुसोबत नेटमध्ये सराव करत होता. तेव्हा त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. यानंतर सूर्यानं त्यावर पट्टी बांधली. तसंच मैदानातून बाहेर पडताना त्याला जास्त दुखापत झाली नसल्याचं दिसलं. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, दुखापतीमुळं सूर्याचं आजच्या सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. यामुळं न्यूझीलंडविरुद्धचा सामना ईशान आणि सूर्यासाठी खेळणं कठीण दिसत आहे. मात्र, याबाबत अद्याप टीम इंडियाच्या निवड समितीकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. दुखापतीमुळं स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या याआगोदर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडलाय. अशातच परिस्थितीत सूर्यकुमार आणि ईशानला दुखापत होऊ नये, असं संघ व्यवस्थापनाला वाटत होतं. मात्र आता या दोघांच्या दुखापतीमुळं प्लेइंग इलेव्हन निवडण्यात अडचणी येऊ शकतात.

प्रशिक्षक राहूल द्रविड काय म्हणाले : सामन्याच्या एक दिवस आधी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत पांड्याच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहेत. ते म्हणाले की, हार्दिक पांड्या आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो प्लेइंग-11 मध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी मदत करतो. आजच्या सामन्यात आम्ही सर्वोत्तम प्लेईंग-11 निवडण्यावर काम करू. सध्या आमच्याकडे फक्त 14 खेळाडू असणार आहेत. त्यानुसार संघातील खेळाडुंची निवड करावी लागेल. यामुळं आमच्या सर्वोत्तम खेळण्यावरही परिणाम होईल. गेल्या 4 सामन्यांमध्ये जशी परिस्थिती होती, तशी ती होणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना पांड्याच्या पायाला दुखापत झाली होती. तो जखमी होऊन मैदानाबाहेर गेला होता.

हेही वाचा :

  1. World Cup 2023 IND vs NZ : भारत, न्यूझीलंडमध्ये होणार काटे की टक्कर; काय आहे भारतीय संघाची रणनीती? वाचा सविस्तर
  2. India vs New Zealand : भारत-न्यूझीलंड विश्वचषक सामन्यांत कोण करणार जादू? जाणून घ्या दोन्ही संघाचा आढावा
  3. World Cup २०२३ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात कोण मारणार बाजी?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.