ETV Bharat / sports

ICC Women's World Cup: भारताचा बांगलादेशवर 110 धावांनी दणदणीत विजय; उपांत्य फेरीचा मार्ग सुकर

author img

By

Published : Mar 22, 2022, 1:35 PM IST

Updated : Mar 23, 2022, 11:39 AM IST

हॅमिल्टन: आयसीसी महिला विश्लचषक ( ICC Women's World Cup ) स्पर्धेतील 22 वा सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात हॅमिल्टन येथे पार पडला. या सामन्यात भारताने बांगलादेशवर 110 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे आता भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला.

India
India

हॅमिल्टन: आयसीसी महिला विश्चचषक स्पर्धेतील 22 वा सामना भारत विरुद्ध बांगलादेश ( India vs Bangladesh ) संघात हॅमिल्टन येथे पार पडला. या सामन्यात भारताने बांगलादेशवर 110 धावांनी विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 229 धावा केल्या होत्या. परंतु बांगलादेशचा संघ या आव्हानाचा पाठलाग करताना 40.3 षटकांत 119 धावांवर गारद झाला. त्यामुळे आता भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला आहे.

दरम्यान भारतीय संघाने या सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम फलंदाजी करताना सलामवीर स्मृती मंधाना ( Opener Smriti Mandhana आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेट्साठी शानदार 74 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मृती मंधाना (30) नहीदा अख्तरची बळी ठरली. त्यानंतर शफाली वर्माने 42 धावांचे योगदान दिले. तिचे फक्त 8 धावांनी अर्धशतक हुकले. शफाली वर्माला रितु मोनीने तंबूत धाडले.

तसेच यस्तिका भाटीयाने भारताचा डाव पुढे घेऊन जाताना 80 चेंडूत शानदार 50 धावांची खेळी केली. ज्यामध्ये 6 चौकार आणि 1 षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. तिला देखील रितु मोनीने बाद केले. त्यानंतर इतर फलंदाजांनी काही खास कामगिरी केली नाही. त्यामुळे भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांच्या समाप्तीनंतर 7 बाद 229 धावा केल्या. बांगलादेशकडून रितु मोनीने सर्वाधिक 3 विकेट्स ( Ritu Moni took maximum 3 wickets ) घेतल्या.

भारतीय संघाने बांगलादेशला 230 धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करायाला उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली. ज्यामध्ये संघाला पहिला धक्का 12 धावांवर बसला. सलामवीर मुर्शिदा खातून आणि शर्मिन अख्तर अनुक्रमे 19 आणि 5 धावांवर बाद झाल्या. त्यानंतर बांगलादेश संघाने फक 18 षटकांत 35 धावांवर निम्मा संघ गमावला. बांगलादेशकडून सर्वाधिक 32 धावांचे योगदान सलमा खातूनने ( Salma Khatun contributes 32 runs ) दिले. त्याचबरोबर लता मंडळने 24 धावांचे योगदान देत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न अपयशी ठरला. कारण इतर फलंदाजांनी कचखाऊ कामगिरी केली. ज्याचा फटका संघाला बसला. बांगलादेशने 40.3 षटकांत 119 धावांवर गारद झाला. भारताकडून गोलंदाजी करताना स्नेह राणाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. तसेच पुनम यादव आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा - Shabaash Mithu Teaser: मिताली राजच्या जीवनावर आधारित 'शाबाश मिठू'चा टीझर रिलीज

Last Updated : Mar 23, 2022, 11:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.