ETV Bharat / sports

ICC Womens ODI Ranking : श्रीलंकेविरुद्धच्या दमदार कामगिरीमुळे हरमनप्रीत आणि मंधानाला ताज्या क्रमवारीत झाला फायदा

author img

By

Published : Jul 12, 2022, 5:46 PM IST

Smriti Harmanpreet
Smriti Harmanpreet

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Captain Harmanpreet Kaur ) फलंदाजांच्या क्रमवारीत 13 व्या स्थानावर आहे, तर मानधना नवव्या स्थानावर असलेली अव्वल भारतीय आहे.

दुबई: मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) महिला खेळाडूंची ताजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर ( ICC Womens ODI Ranking Announce ) केली आहे. या क्रमवारीत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना ( Vice-Captain Smriti Mandhana ) एका स्थानांचा फायदा झाला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत हरमनप्रीत 13व्या स्थानावर आहे, तर नवव्या क्रमांकावर असलेली मंधाना भारतीय खेळाडूंमध्ये अव्वल आहे.

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत हरमनप्रीतने 59.50 च्या सरासरीने 119 धावा केल्या आणि तीन विकेट घेतल्या. तिने भारतीय संघाला मालिकेत 3-0 अशी आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिला मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले. मंधानाने या मालिकेत 52 च्या सरासरीने धावा केल्या. या काळात तिने शतकही झळकावले.

या क्रमवारीत वर जाणाऱ्या इतर भारतीय फलंदाजांमध्ये शेफाली वर्मा ( Batsman Shefali Verma ) (तीन स्थानांनी वर 33व्या स्थानावर), यास्तिका भाटिया (एक स्थानाने वर 45व्या स्थानावर) आणि गोलंदाजी-अष्टपैलू पूजा वस्त्राकर (आठ स्थानांनी वर 53व्या स्थानावर) यांचा समावेश आहे. गोलंदाजांमध्ये राजेश्वरी गायकवाड तीन स्थानांनी सुधारून संयुक्त नवव्या, मेघना सिंगने दोन स्थानांनी सुधारणा करून 43व्या स्थानावर तर वस्त्रकारने दोन स्थानांनी सुधारणा करत संयुक्त 48व्या स्थानावर पोहोचले आहे.

या दौऱ्यात संघात स्थान न मिळालेली अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ( Veteran fast bowler Jhulan Goswami ) गोलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली आणि इंग्लंडची नताली स्कायव्हर फलंदाजांच्या यादीत पहिल्या दोन स्थानांवर आहेत, तर गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन आणि दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माइल अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

हेही वाचा - Sunil Gavaskar Statement : ज्येष्ठ खेळाडू आयपीएल खेळू शकतात तर देशासाठी का नाही सुनील गावस्करांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.