ETV Bharat / sports

IPL 2022 : "त्याने आपल्या आईला गरिबीतून बाहेर काढण्याचे वचन दिले होते", इयान बिशपने कॅरिबियन खेळाडूची सांगितली कहाणी

author img

By

Published : Apr 29, 2022, 4:41 PM IST

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मधील 41 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( DC vs KKR ) संघात खेळला गेला. या सामन्यात रोव्हमॅन पॉवेलच्या नाबाद 33 धावांच्या जोरावर दिल्लीने 4 विकेट्सने सामना जिंकला. यानंतर आता वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू इयान बिशप ( Former cricketer Ian Bishop ) यांनी रोव्हमॅन पॉवेलची मनाला स्पर्श करणारा एक किस्सा सांगितला आहे.

Rowman Powell
Rowman Powell

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या ( Indian Premier League ) हंगामातील 41 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals ) संघात खेळला गेला. या सामन्यात कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना कोलकाताला 147 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करताना, रोव्हमॅन पॉवेलच्या नाबाद 33 धावांच्या जोरावर दिल्लीने 4 विकेट्सने सामना जिंकला. यानंतर आता वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू इयान बिशप यांनी रोव्हमॅन पॉवेलची मनाला स्पर्श करणारा एक किस्सा सांगितला आहे.

वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशपने दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज रोव्हमन पॉवेलचे ( Batsman Rowman Powell ) कौतुक करताना, पॉवेलची हृदयद्रावक कहानी सांगितली आहे. जेव्हा रोव्हमॅन पॉवेल माध्यमिक शाळेत होता, तेव्हा त्याने आपल्या आईला गरिबीतून बाहेर काढण्याचे वचन दिले होते.

इयान बिशपने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, 'जर कोणाकडे 10 मिनिटे वेळ असेल, तर जा आणि रोव्हमन पॉवेलची जीवनकथा ( Biography of Rowman Powell ) पहा, ज्याचा व्हिडिओ यूट्यूबवर आहे. पॉवेलने आयपीएलमध्ये यशाची चव चाखल्यामुळे माझ्यासह अनेकांना आनंद का झाला हे तुम्हाला दिसेल. तो गरीब कुटुंबातून येतो. जेव्हा तो माध्यमिक शाळेत होता. तेव्हा त्याने त्याच्या आईला वचन दिले होते की, तो त्यांना गरिबीतून बाहेर काढेल. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. अप्रतिम कथा.'

जमैकामधील ओल्ड हार्बरच्या बॅनिस्टर जिल्ह्यात जन्मलेल्या पॉवेलला त्याच्या विधवा आई आणि लहान बहिणीसह अनेक संकटांचा सामना करावा लागला. 2020 मध्ये कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये बनवलेल्या माहितीपटात ( Rowman Powell Documentary ) पॉवेलची शून्यापासून ते आतापर्यंतची भावनिक कथा दाखवली आहे.

त्यानंतर इयान बिशपने पॉवेलच्या फलंदाजीवर लक्ष वेधताना सांगितले की, तो एक चांगला खेळाडू आहे. इयान बिशप म्हणाले, “कॅरेबियन भूमीवर आदिल रशीद आणि मोईन अली यांच्याविरुद्ध मी त्याच्या शतकांचा विचार करत होतो. गेल्या फेब्रुवारीत भारतात या फिरकीपटूंविरुद्ध त्याची सरासरी 43 होती. त्याच्यात बरीच सुधारणा झाली आहे. तो वेगवान गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळतो आणि त्याने बरीच सुधारणा दाखवली आहे.

आयपीएल 2022 च्या सुरुवातीला पॉवेलचे प्रदर्शन खराब होते. दिल्ली कॅपिटल्ससाठी पहिल्या पाच सामन्यांमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 20 होती, ज्यामध्ये दोन शून्यांचा समावेश होता. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 15 चेंडूत 36 धावा करून काहीसा फॉर्म शोधला होता. मात्र, या सामन्यात दिल्लीचा 15 धावांनी पराभव झाला होता.

हेही वाचा - Cricketer Virat Kohli : माजी क्रिकेटपटूने सांगितला विराटचा 'तो' किस्सा, जेव्हा विव्ह रिचर्ड्स विराटला म्हणाले होते धन्यवाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.