ETV Bharat / sports

Graeme Smith : ग्रॅमी स्मिथला मोठा दिलासा, वर्णद्वेषाच्या आरोपातून झाली मुक्तता

author img

By

Published : Apr 25, 2022, 8:25 PM IST

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, SJN आयोगाचे प्रमुख डुमिसा न्त्सेबेझा ( Dumisa Ntsebeza ) यांनी सादर केलेल्या 235 पानांच्या अहवालात स्मिथ, विद्यमान मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर ( Coach Mark Boucher ) आणि माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स यांच्यासह इतरांवर वांशिक भेदभाव केल्याचा आरोप केला होता.

Graeme Smith
Graeme Smith

जोहान्सबर्ग: बोर्डाच्या सामाजिक न्याय आणि राष्ट्र-निर्माण (SJN) आयोगाच्या अहवालाच्या निकालानंतर क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) क्रिकेटचे माजी संचालक आणि कर्णधार ग्रॅमी स्मिथ ( Graeme Smith ) यांना त्यांच्यावरील वर्णद्वेषाच्या आरोपातून मुक्त करण्यात आले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, SJN आयोगाचे प्रमुख डुमिसा न्त्सेबेझा यांनी सादर केलेल्या 235 पानांच्या अहवालात स्मिथ, विद्यमान मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर आणि माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स यांच्यासह इतरांवर वांशिक भेदभाव केल्याचा आरोप केला होता.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड (CSA) च्या निवेदनात म्हटले आहे की स्मिथला 2012 ते 2014 या कालावधीत थामी सोलेकिले विरुद्ध वांशिक भेदभावात सहभागी होण्याचे कोणतेही स्पष्ट कारण नव्हते. शिवाय, एनोक नाक्वेऐवजी मार्क बाउचरला दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याच्या स्मिथच्या निर्णयाला वांशिक भेदभावाचे कोणताही स्पष्ट आधार नव्हता. स्मिथचा सीएसएच्या क्रिकेट संचालकपदाचा कार्यकाळ आधीच संपुष्टात आला आहे. त्याचा करार 31 मार्च रोजी संपला आणि त्याने सीएसएकडे या पदासाठी पुन्हा अर्ज न करण्याचा पर्याय निवडला.

दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर ( Head Coach Mark Boucher ) हेही मैदानाबाहेर वांशिक भेदभावामुळे चर्चेत आले आहेत. बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर मार्क बाउचरने या प्रकरणावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'मी खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा खूप आनंद घेतला आहे. आमच्याकडे खरोखरच एक चांगला संघ आहे आणि मला लोकांच्या आसपास राहणे आणि त्यांचे क्रिकेट वाढताना पाहणे आवडते. याशिवाय मैदानाबाहेर जे काही घडले, त्याचा मी आनंद घेतला असे म्हणता येणार नाही. खरे सांगायचे तर, माझ्या पदावरील कोणालाही हे प्रकरण आवडेल असे मला वाटत नाही.'

हेही वाचा - Ipl 2022 Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टॉप ऑर्डरच्या खराब कामगिरीमुळे हेसन चिंतेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.