ETV Bharat / sports

Eng Vs Ind : भारताचे इंग्लंडसमोर विजयासाठी 368 धावांचे आव्हान

author img

By

Published : Sep 5, 2021, 10:02 PM IST

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना ओवलच्या मैदानावर रंगला आहे. भारताचा दुसरा डाव 466 धावांत आटोपला. यामुळे इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे आव्हान मिळाले आहे.

eng vs ind 4th test : India all out for 466, set England 368-run target
Eng Vs Ind : भारताचे इंग्लंडसमोर विजयासाठी 368 धावांचे आव्हान

ओवल - इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 466 धावांवर आटोपला. यानंतर इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे आव्हान मिळाले आहे. दरम्यान, भारतीय संघाने या सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना ओवलच्या मैदानात रंगला आहे. भारतीय संघाने नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 191 धावा केल्या. यानंतर इंग्लंड संघाने 290 धावा करत पहिल्या डावात 99 धावांची आघाडी मिळवली. तेव्हा भारतीय संघ दबावात आला. पण दुसऱ्या डावात भारतीय संघाने दमदार फलंदाजीचे दर्शन घडवले.

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजी बहरली

भारतीय संघाने दुसऱ्या डावात 466 धावा करत इंग्लंडसमोर विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य ठेवले. रोहित शर्माने 14 चौकार आणि 1 षटकारासह झंझावती 127 धावांची खेळी केली. यानंतर चेतेश्वर पुजारा (61), शार्दुल ठाकूर (60), ऋषभ पंत (50), के एल राहुल (46), विराट कोहली (44), उमेश यादव (25) आणि जसप्रीत बुमराह याने 24 धावांचे योगदान दिले.

शार्दुल ठाकूर-ऋषभ पंतची भागिदारी

शार्दुल ठाकूर आणि ऋषभ पंत या जोडीने इंग्लंड गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी 4.5 च्या सरासरीने धावा केल्या. या दोघांनी सातव्या शतकी भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर भारतीय संघाला मोठी आघाडी घेतला आली.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने सर्वाधिक 3 गडी बाद केले. ओली रॉबिन्सन आणि मोईन अलीने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. याशिवाय जेम्स अँडरसन आणि जो रूटला प्रत्येकी 1-1 गडी बाद करता आला.

दरम्यान, उभय संघात पाच कसोटी सामन्याची मालिका खेळवली जात आहे. सद्यघडीला मालिका 1-1 असा बरोबरीत आहे. दोन्ही संघाचा मनसुबा चौथा कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा आहे.

हेही वाचा - ENG vs IND: रवी शास्त्रींना कोरोनाची लागण, प्रशिक्षकांसह 4 जण विलगीकरणात

हेही वाचा - सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह करतोय ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.