ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : विश्वचषक सामन्यापूर्वी 'या' स्टेडियमच्या खेळपट्टीत सुधारणा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 4:40 PM IST

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

Cricket World Cup 2023 : विश्वचषक सामन्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमच्या खेळपट्टीचं नूतनीकरण सुरू झालंय. या नूतनीकरणादरम्यान समोर आलेली वस्तुस्थिती धक्कादायक आहे. खेळपट्टी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात मीठ प्रमाणापेक्षा जास्त असल्याचं आढळून आलंय. त्यामुळं खेळपट्टी (पीच) गोलंदाजाना फायद्याची ठरत आहे. या 'पीच'मुळं फलंदाजांना फटका बसत आहे.

लखनऊ (उत्तर प्रदेश) Cricket World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक 2023 सुरू झाला आहे. वर्ल्ड कप 2023 चा पहिला सामना इंग्लंड, न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये न्यूझीलंडने 9 विकेट्सनं शानदार विजय मिळवलाय. यावेळी भारत विश्वचषकाचं यजमानपद भूषवत असून, यासाठी स्टेडियमवर पूर्वीपेक्षा विशेष सुविधा, तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञानानं खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.

'एकना' स्टेडियमवर होणार 5 सामने : लखनऊचं भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी 'एकना' क्रिकेट स्टेडियम देखील आयसीसी विश्वचषक 2023 साठी सज्ज आहे. विश्वचषक 2023 चे 5 सामने एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी जागतिक दर्जाच्या सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच खेळपट्टीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.

पाण्यात मिठाचं प्रमाण जास्त : अटलबिहारी वाजपेयी 'एकना' स्टेडियममध्ये वापरण्यात आलेल्या पाण्यात मिठाचं प्रमाण जास्त आढळून आलं होतं. त्यामुळं येथे झालेल्या सामन्यांमध्ये कमी धावा झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय, इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यांमध्ये कमी धावसंख्येमुळं बराच गदारोळ झाला होता. आयपीएलनंतर या खेळपट्टीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळं प्रति सामना ३०० हून अधिक धावा होतील, असा दावा स्टेडियम प्रशासन करत आहे.

300 पेक्षा जास्त धावांचा दावा : स्टेडियमचे संचालक उदय सिन्हा म्हणाले की, आता स्पर्धात्मक खेळपट्टी उत्तम दर्जाची तयार झाली आहे. "खेळपट्टीतील त्रुटी दूर झाल्या आहेत. त्यामुळं प्रत्येक सामन्यात 300 पेक्षा जास्त धावा होतील," असा दावा त्यांनी केलाय. खेळपट्टी तयार करताना पाण्यात मीठ जास्त असल्यानं रासायनिक अभिक्रिया झाली होती. त्यामुळं इंडियन प्रीमियर लीग दरम्यान खेळपट्टीवर अधिक धावा करता आल्या नाहीत.

खेळपट्टीत सुधारणा : एप्रिल, मेमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात यजमान संघान 125 धावा करून सामना गमावला होता. आयपीएलपूर्वी भारत-न्यूझीलंड यांच्यातील टी-20 कमी धावाचं प्रकरण समोर आलं होतं. पीचवर काळ्या मातीचा वापर केल्यामुळं एकानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी योग्य नसल्याचं म्हटलं जात होतं. बीसीसीआयनं यासंदर्भात एक समितीही स्थापन केली आहे. न्यूझीलंड, भारत यांच्यातील कमी धावसंख्येनंतर खेळपट्टीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळं विश्वचषकातील पाच सामने एकना स्टेडियमवर होणार आहेत.

हेही वाचा -

  1. Asian Game 2023 : आशियाई गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक, उपमुख्यमंत्र्यांनी साधला 'चँपियन'च्या आई-वडिलांशी संवाद
  2. ICC Cricket World Cup 2023 PAK vs NED : रिझवान-शकीलनं पाकिस्तानचा डाव सावरला, वाचा स्कोर
  3. Asian Game 2023 : उपांत्य सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचं विजयी 'तिलक', अंतिम फेरीत प्रवेश करत केलं पदक निश्चित
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.