ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानचे पाच मॅचविनर खेळाडू  'या' विश्वचषकात करू शकतात दमदार कामगिरी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 11:20 AM IST

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

Cricket World Cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या एकदिवसीय विश्वचषकासाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. यापैकी अफगाणिस्तानच्या टीमला कसंच हलक्यात घेता येणार नाही. या टीममध्ये एकापेक्षा एक मॅचविनर खेळाडू आहेत. कोण आहेत हे खेळाडू आणि त्यांची आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली आहे, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी..

मुंबई Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ मैदानावर अपसेट घडवून आणण्यासाठी ओळखला जातो. आगामी विश्वचषकात या संघाकडून पुन्हा एकदा अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. अफगाणिस्तानकडे जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत, जे भारतीय ट्रॅकवर विरोधी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवू शकतात. या बातमीत जाणून घ्या अफगाणिस्तानचे पाच असे प्रमुख खेळाडू जे या विश्वचषकात आपल्या कामगिरीनं समोरच्या संघाला नाकीनऊ आणू शकतात.

  1. राशिद खान : जागतिक दर्जाचा लेगस्पिनर राशिद खान अफगाणिस्तानचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्या नावे ९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४.२१ च्या इकॉनॉमीसह १७२ विकेट्स आहेत. राशिदची फलंदाजी देखील तितकीच घातक मानली जाते. त्यानं संघासाठी अनेकदा महत्त्वाच्या प्रसंगी फलंदाजीद्वारे चमत्कार घडवून आणले आहेत. राशिदनं ९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १९.५३ ची सरासरी आणि पाच अर्धशतकांच्या मदतीनं १,२११ धावा ठोकल्या आहेत. नाबाद ६० रन ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
  2. मुजीब उर रहमान : युवा मुजीब उर रहमाननं एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. अल्पावधीतच तो संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक बनलाय. तो आतापर्यंत ६६ एकदिवसीय सामने खेळला असून त्यात त्यानं ४.१५ च्या अविश्वसनीय इकॉनॉमीसह ९३ बळी घेतले आहेत. ५/५० ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. फलंदाजीत मुजीबनं एका अर्धशतकासह १८५ धावा केल्या आहेत.
  3. मोहम्मद नबी : माजी कर्णधार व अष्टपैलू मोहम्मद नबी हा अफगाणिस्तानचा आणखी एक महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. नबीनं आतापर्यंत ४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये एक शतक आणि १६ अर्धशतकांसह ३,१५३ धावा केल्या आहेत. यात त्याची सरासरी २७.१८ ची असून स्ट्राइक रेट ८६.१७ आहे. ११६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. यासह त्यानं ४.२९ च्या इकॉनॉमीसह १५४ विकेट्सही घेतल्या आहेत.
  4. इब्राहिम झद्रान : फलंदाज इब्राहिम झद्राननं १९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५३.३८ ची उत्कृष्ट सरासरी आणि ८४.३५ च्या स्ट्राइक रेटनं ९११ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यानं चार शतकं आणि एक अर्धशतक ठोकलं. त्याची सर्वोच्च धावसंख्या १६२ आहे.
  5. रहमानउल्ला गुरबाज : रहमानउल्ला गुरबाज हा या विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी महत्त्वाचा फलंदाज ठरू शकतो. गेल्या काही वर्षांत त्यानं संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. तो आतापर्यंत २६ एकदिवसीय सामने खेळला असून त्यात त्यानं ३८.३२ सरासरी आणि १३४.५८ च्या धमाकेदार स्ट्राइक रेटनं ९५८ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यानं ५ शतकं आणि २ अर्धशतकही झळकावली. १५१ ही गुरबाजची सर्वोच्च धावसंख्या आहे. आता अफगाण संघाला विश्वचषकात चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी गुरबाजवर असेल.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावे आहेत सर्वाधिक धावा, जाणून घ्या कोण आहेत अव्वल पाच फलंदाज
  2. Cricket World Cup 2023 : बांग्लादेशच्या 'या' ५ खेळाडूंना अजिबात हलक्यात घेऊ नका, जाणून घ्या कोण आहेत हे खेळाडू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.