वेलिंग्टन - न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज टॉम लाथनने केन विल्यमसनला धक्का देत न्यूझीलंडचा २०१९ सालचा सर्वश्रेष्ठ फलंदाज बनण्याचा मान पटकावला आहे. न्यूझीलंड क्रिकेटमध्ये दरवर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला पुरस्कार दिला जातो. मागील ७ वर्षांपासून हा पुरस्कार केन विल्यमसन आणि रॉस टेलर पटकावत होते. पण यंदा लाथम सर्वश्रेष्ठ फलंदाज ठरला आहे.
टॉम लाथमने ऑगस्ट २०१९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे खेळताना १५४ धावांची खेळी केली होती. त्याच्या याच खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत बरोबरी साधली होती. लाथमने मागील वर्षी ९ कसोटी सामन्यात ४०.५३ च्या सरासरीने ६०८ धावा केल्या आहेत.
गोलंदाजीमध्ये टीम साऊदी सर्वश्रेष्ठ गोलंदाज ठरला. त्याने हा पुरस्कार तब्बल ६ वेळा पटकावला आहे. साऊदीने मागील वर्षी २१.४७ च्या सरासरीने ४० गडी बाद केले आहेत. दरम्यान, हे पुरस्कार ऑनलाईन देण्यात येत आहेत.
हेही वाचा - Happy Birthday Rohit Sharma : एकेकाळी शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे, आज आहे टीम इंडियाचा 'हिटमॅन'
हेही वाचा - HBD Rohit : रोहितने गुडघ्यावर बसून रिंग देत रितिकाला केलं प्रपोज, वाचा हिटमॅनची बॉलिवूड स्टाईल लवस्टोरी