ETV Bharat / sports

VIDEO : न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने घेतलेला जबरदस्त झेल पाहिलात का?

author img

By

Published : Feb 29, 2020, 3:57 PM IST

मुंबईकर पृथ्वी शॉने ६४ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ५४ धावा केल्या. मात्र, उपहाराच्या सत्राआधीच तो जेमिसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या लॅथमने हवेत उडी मारत एका हातात झेल घेत त्याला बाद केले.

tom latham takes blinder in second test match
VIDEO : न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने घेतलेला 'हा' जबरदस्त झेल पाहिलात का?

ख्राईस्टचर्च - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी ख्राईस्टचर्च येथे सुरू झाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताने पहिल्या डावात २४२ धावा केल्या. या डावात भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉने जबरदस्त अर्धशतक झळकावले. अर्धशतकानंतर न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने जबरदस्त झेल घेत पृथ्वीला माघारी धाडले.

हेही वाचा - दिलेला 'चेक' परत कर..! पाकिस्तान बोर्डाचा उमर अकमलला आदेश

मुंबईकर पृथ्वी शॉने ६४ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ५४ धावा केल्या. मात्र, उपहाराच्या सत्राआधीच तो जेमिसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या लॅथमने हवेत उडी मारत एका हातात झेल घेत त्याला बाद केले. या डावात जेमिसनने ४५ धावात ५ बळी टिपले.

या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीच्या अर्धशतकांमुळे भारताला ६३ षटकात २४२ धावा करता आल्या. पुजाराने ६ चौकारांसह ५४ आणि विहारीने १० चौकारांसह ५५ धावा केल्या. विराट कोहली या डावातही अपयशी ठरला. त्याला ३ धावांवर साऊदीने पायचित पकडले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.