ETV Bharat / sports

जॉनी बेअरस्टो बिग बॅश लीगमध्ये खेळणार

author img

By

Published : Sep 20, 2020, 3:55 PM IST

Jonny bairstow to join big bash league team melbourne stars report
जॉनी बेअरस्टो बिग बॅश लीगमध्ये खेळणार

जॉनी बेअरस्टो मेलबर्न स्टार्स तर मलान होबार्ट हरिकेन्स संघात सामील होऊ शकतो. या दोघांव्यतिरिक्त जेसन रॉय पर्थ स्कॉर्चर्सच्या रडारवर आहे.

लंडन - इंग्लंडचा स्फोटक फलंदाज आणि आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळणारा जॉनी बेअरस्टो बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल ) खेळताना दिसणार आहे. बेअरस्टो सोबत डेव्हिड मलानही बीबीएलमध्ये खेळेल. येत्या काही दिवसांत या दोघांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

एका वृत्तानुसार, बेअरस्टो मेलबर्न स्टार्स तर, मलान होबार्ट हरिकेन्स संघात सामील होऊ शकतो. या दोघांव्यतिरिक्त जेसन रॉय पर्थ स्कॉर्चर्सच्या रडारवर आहे, तर जोए डेन्लीला संघात दाखल करून घेण्यासाठी मेलबर्न रेनेगेड्सने पसंती दर्शवली आहे.

टॉम बंटन आणि लियाम लिव्हिंगस्टोन पुन्हा एकदा लीगमध्ये खेळताना दिसू शकतात. हे दोघेही २०१९-२०मध्ये बीबीएलमध्ये खेळले आहेत. बेन स्टोक्स आणि जोस बटलरदेखील बीबीएल फ्रेंचायझींच्या नजरेत आहेत. मात्र, २०२१च्या सुरुवातीला श्रीलंका आणि भारत दौर्‍यामुळे दोघेही उपलब्ध नसतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.