ETV Bharat / sports

कसोटी : सलामीवीर म्हणून शतकी ठोकणारा रोहित चौथा; १, २, ३ कोण आहेत वाचा...

author img

By

Published : Oct 2, 2019, 6:34 PM IST

रोहितने १२ चौकार आणि ५ षटकाराच्या साह्याने नाबाद ११५ धावांनी खेळी केली. सलामीच्या सामन्यात भारताकडून शतक ठोकणारा रोहित चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी आणखी तीन भारतीय क्रिकेटपटूंनी सलामीच्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली आहे. वाचा कोण आहेत ते खेळाडू....

कसोटी : सलामीवीर म्हणून शतकी ठोकणारा रोहित चौथा, तर १, २, ३ कोण आहेत वाचा...

नवी दिल्ली - टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुध्द विशाखापट्टणच्या मैदानात पहिला कसोटी सामना खेळत आहे. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला पहिल्यादांच उतरलेल्या रोहित शर्माने नाबाद शतकी खेळी करत पहिला दिवस गाजवला. रोहितने १२ चौकार आणि ५ षटकाराच्या साह्याने नाबाद ११५ धावांनी खेळी केली. सलामीच्या सामन्यात भारताकडून शतक ठोकणारा रोहित चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी आणखी तीन भारतीय क्रिकेटपटूंनी सलामीच्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली आहे. वाचा कोण आहेत ते खेळाडू....

हेही वाचा - रोहित शर्मा : आयसीसीच्या क्रिकेट इतिहासात 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

शिखर धवन -
आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात, शिखर धवनने सलामीला उतरत शतकी खेळी केली होती. धवन आपला पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरोधात मोहालीच्या मैदानात खेळला आहे. या सामन्यात धवनने १७४ चेंडूत १८७ धावांची दणकेबाज खेळी केली होती. महत्वाचे म्हणजे, धवनने या खेळीत २ षटकार आणि तब्बल ३३ चौकार मारले होते.

ind vs sa 2019 : rohit sharma became fourth indian batsman who hits century in the maiden innings as an opener
शिखर धवन शतकानंतर आनंद व्यक्त करताना...

केएल राहुल -
केएल राहुलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनीमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय सलामीवीराच्या भूमिकेत शतकी खेळी होती. राहुलने या सामन्यात मुरली विजयच्या सोबत डावाची सुरूवात केली होती. त्याने या सामन्यात ११० धावांची खणखणीत खेळी केली होती.

ind vs sa 2019 : rohit sharma became fourth indian batsman who hits century in the maiden innings as an opener
केएल राहुल शतकानंतर प्रेक्षकांना अभिवादन करताना...

पृथ्वी शॉ -
टीम इंडियाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने, वेस्ट इंडीजविरुध्द सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने राजकोट येथे झालेल्या सामन्यात वेस्ट इंडीज विरुध्द शतकी खेळी केली होती. शॉने या सामन्यात १९ चौकाराच्या मदतीने १३४ धावा केल्या होत्या.

ind vs sa 2019 : rohit sharma became fourth indian batsman who hits century in the maiden innings as an opener
भारताचा युवा सलामीवीर पृश्वी शॉ शतकानंतर आनंद व्यक्त करताना...

हेही वाचा - IND VS SA : 'हिटमॅन'ची ऐतिहासिक सलामी, रचले 'हे' खास विक्रम

Intro:Body:

sports marathi


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.