ETV Bharat / sports

क्रिकेटनंतर राजकारणाच्या पटलावर नशीब आजमावणारे 'हे' आहेत क्रिकेटपटू

author img

By

Published : Mar 22, 2019, 6:00 PM IST

बॉलीवूडमधील कलाकार आणि क्रिकेटपटू हे एका तपानंतर राजकारण प्रवेश करतात. गंभीरपूर्वी काही क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश करुन छाप सोडली आहे.

राजकारणातले क्रिकेटपटू

मुंबई - भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तो राजकारणात येणार अशी, चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून रंगत होती. आज ती चर्चा खरी ठरली. बॉलीवूडमधील कलाकार आणि क्रिकेटपटू हे एका तपानंतर राजकारण प्रवेश करतात. गंभीरपूर्वी काही क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश करुन छाप सोडली आहे. त्या क्रिकेटपटूंची माहिती जाणून घेऊया.

नवजोत सिंग सिध्दू

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिध्द समालोचक नवजोत सिंग सिध्दू त्यांच्या हजरजबाबीपणामुळे राजकारणात आले. २००४ साली त्यांनी भाजपतून राजकारणात एंन्ट्री केली. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना दोनदा विजय मिळाला. त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष आवाज-ए-पंजाब उभा केला. नंतर काँग्रेसशी मैत्री केले. सध्या ते पंजाब कॅबिनेट मंत्री आहेत.

मोहम्मद कैफ
चपळ क्षेत्ररक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद कैफने २००६ साली त्याचा शेवटचा सामना खेळला. २०१४ मध्ये तो काँग्रेससोबत हातमिळवणी करत इलाहाबाद येथे लोकसभेची निवडणूक लढली, पण त्याला यश आले नाही. सध्या तो समालोचकाच्या भूमिकेत आहे.

प्रवीण कुमार
भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने २०१७ साली मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत (समाजवादी पक्ष) सपमध्ये प्रवेश केला. गेल्यावर्षी प्रवीण कुमारने क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

विनोद कांबळी
विनोद कांबळी मधल्या फळीतला स्टायलिश फलंदाज आहे. क्रिकेटनंतर कांबळी लोक भारती पक्षात सामील झाला. त्यात त्याला उपाध्यक्ष पद देण्यात आले. मुंबईतल्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली पण त्याला यश आले नाही.

मन्सूर अली खान पटौदी
भारताचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पटौदी यांनी क्रिकेटनंतर राजकारणात नशीब आजमवले. त्यांनी १९९१ साली भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढविली, त्यात ते हरले.

मोहम्मद अझरुद्दीन
माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी २००९ साली काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली. उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. मोठ्या फरकाने विजय मिळवत ते खासदार झाले.

कीर्ति आझाद
१९८३ साली झालेल्या विश्वचषकातील सदस्य कीर्ति आझाद यांचा परिवार राजकारणाशी पहिल्यापासून जोडला गेला आहे. त्यांचे वडील भागवत झा आझाद बिहारचे मुख्यमंत्री होते. क्रिकेटनंतर आझाद यांनी २०१४ साली बिहारच्या दरभंगा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि विजय मिळविला. सध्या त्यांचा लोकसभेचा तिसरा कार्यकाळ सुरू आहे.

Intro:Body:

former indian cricketer gautam gambhir joins bjp know other cricketers who joined politics

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.