प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे आणि VVS लक्ष्मण यांच्याशी BCCI संपर्क करण्याची शक्यता

author img

By

Published : Sep 18, 2021, 4:26 PM IST

BCCI may approach Anil Kumble, VVS Laxman for head coach's post

रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर संपणार आहे. अशात बीसीसीआय भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करणार यांची चर्चा रंगली आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार, भारताचे महान फिरकीपटू अनिल कुंबळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बीसीसीआय प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगू शकते.

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर संपणार आहे. ते पुढे प्रशिक्षकपदी कायम राहु इच्छित नसल्याचे संकेत मिळत आहेत. अशात बीसीसीआय प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करणार यांची चर्चा रंगली आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार भारताचे महान फिरकीपटू अनिल कुंबळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बीसीसीआय प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगू शकते.

अनिल कुंबळे हे याआधी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत. कर्णधार विराट कोहलीसोबत त्यांचे मतभेद झाले होते. कुंबळे यांनी 2016-17 या काळात भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचे काम पहिलं आहे. सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीने त्यांची नियुक्ती केली होती. पण चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर त्यांचे विराट कोहलीसोबतचे मतभेद समोर आले. तेव्हा कुंबळे यांनी राजीनामा दिला होता. आता ते पुन्हा प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत येऊ शकतात.

बीसीसीआय कुंबळे यांच्याशिवाय व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी देखील संपर्क करू शकते. ते देखील भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार आहेत.

बीसीसीआयमधील सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितलं की, अनिल कुंबळे यांनी ज्या परिस्थितीमध्ये आपलं पद सोडले होते. त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने सीओए विराट कोहलीच्या दबावात आली आणि त्यांनी अनिल कुंबळे यांना हटवले होतो, ही चांगली बाब नव्हती. परंतु आता कुंबळे आणि लक्ष्मण या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत की नाही. यावर सर्व गोष्टी निर्भर आहेत.

दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय टी-20 संघाचे कर्णधार पद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच रवी शास्त्री यांचा कार्यकाल देखील संपणार आहे. तेव्हा बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळलेले तसेच प्रशिक्षक पदाचा अनुभव असलेले अनिल कुंबळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नावाला पसंती आहे.

हेही वाचा - संतप्त शोएब म्हणाला, ''न्यूझीलंडने पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली''

हेही वाचा - T20 WC 2021: विराट कोहलीनंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देखील देणार राजीनामा, दिले संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.