ETV Bharat / sports

Asian Games 2023: भारतीय महिला क्रिकेट संघाकडून श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव, एशियन गेम्समध्ये जिंकले सुवर्ण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 3:58 PM IST

Updated : Sep 25, 2023, 4:05 PM IST

भारतीय महिला क्रिकेट संघानं सुवर्णपदक जिंकून दमदार कामगिरी केली आहे. हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला क्रिकेट संघानं श्रीलंकेला १९ धावांनी पराभूत केलं आहे.

Asian Games 2023
Asian Games 2023

हांगझोऊ : श्रीलंकेच्या मधल्या फळीतील फलंदाज हसिनी परेरा (25) आणि निलाक्षी डी सिल्वा (23) यांनी सुरेख खेळी करत श्रीलंकेला विजयाच्या उंबरठ्याजव पोहोचण्यास मदत केली. मात्र, भारतीय महिला गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या विजयाचं स्वप्न धुळीस मिळालं.

प्रथम फलंदाजी करताना स्मृती आणि जेमिमाह यांनी अनुक्रमे 46 आणि 42 धावा करून धावांचा डोंगर रचला. जेमिमाह रॉड्रिग्जनेही 40 चेंडूत 42 धावांचे योगदान दिले. शेफाली वर्मा 9 धावांवर लवकर बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौरलाही केवळ 2 धावा करता आल्या. शेफाली वर्मा आणि जेमिमा यांनी ७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केल्यानं भारतीय संघ 116 धावांपर्यंत पोहोचला.

  • भारताच्या वेगवान गोलंदाज साधूनं चार षटकांत ६ धावा देत श्रीलंकेचे तीन विकेट घेऊन श्रीलंकेला शरणागती पत्करायला लावली. राजेश्वरी गायकवाडने दोन बळी घेत भारताचा विजय सुकर केला. दीप्ती शर्मा, देविका वैद्य आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
  • चक दे इंडिया...

    आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेट विभागात भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत श्रीलंकन महिला क्रिकेट संघाचा पराभव करीत #सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

    आपल्या देदीप्यमान कामगिरीच्या माध्यमातून भारतीय महिला क्रिकेट संघाने चीन येथील हांगझोऊ येथे भारतीय… pic.twitter.com/lndlhJevXl

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • राजेश्वरीनं अखेरच्या षटकात केलेल्या गोलंदाजीनं भारताला विजय मिळवून दिला. राजेश्वरी गायकवाडने शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करत कुमारीला त्रिफळाचीत केले. राजेश्वरीने 1 धाव देत भारताला 19 धावांनी विजय मिळवून दिला. यासह भारतीय महिला संघाने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. देविका वैद्यनं श्रीलंकेच्या फलंदाजांना आक्रमक होण्याची संधी दिली नाही. देविकानं 19व्या षटकात 5 धावा दिल्या आहेत. यासोबतच देविकानं 5 धावांच्या स्कोअरवर कविशा दिलहरीला रिचा घोषच्या हातून बाद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला क्रिकेट संघाचं केलं कौतुक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडिया एक्समध्ये पोस्ट करत भारतीय महिला संघाचं कौतुक केलय. त्यांनी म्हटलं की, चक दे इंडिया... आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेट विभागात भारतीय महिला क्रिकेट संघानं अंतिम फेरीत श्रीलंकन महिला क्रिकेट संघाचा पराभव करीत #सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं. आपल्या देदीप्यमान कामगिरीच्या माध्यमातून भारतीय महिला क्रिकेट संघानं चीन येथील हांगझोऊ येथे भारतीय तिरंगा फडकवला आहे. या ऐतिहासिक एशियाड क्रिकेट सुवर्ण कामगिरीचा आम्हा सर्व भारतवासिंयांना आपला सार्थ अभिमान आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडून संघाचं अभिनंदन- भारतीय महिला क्रिकेट संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेत 18 वर्षीय तितास साधूच्या गोलंदाजीच्या बळावर (6 गडी बाद 3 बळी) श्रीलंकेवर विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल संघाचे आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन, असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केले.

हेही वाचा-

  1. IND Vs SL Final Match : भारतीय संघाकडून 'लंका पतन'; भारताचा 10 गडी राखून धडाकेबाज विजय, आशिया कपावर आठव्यांदा कोरलं नाव
Last Updated : Sep 25, 2023, 4:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.