Andrew Symonds Statement : आयपीएलमध्ये सर्वाधिक पैसे मिळाले म्हणून मायकल क्लार्क जळत होता - अँड्र्यू सायमंड्स

author img

By

Published : Apr 24, 2022, 5:50 PM IST

Andrew Symonds

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सने ( Former cricketer Andrew Symonds ) मायकल क्लार्कसोबतच्या ( Michael Clark ) कट्टू संबंधांवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलमध्ये मिळालेल्या पैशांमुळे दोन्ही खेळाडूंच्या नात्यात दुरावा कसा निर्माण झाला हे त्याने सांगितले.

हैदराबाद: आयपीएल ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी टी-20 लीग म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत जगभरातील क्रिकेट भाग घेतात आणि आपले नशिब आजमवतात. यामध्ये काही यशस्वी होतात, तर काही अपयशी ठरतात. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सने ( Former cricketer Andrew Symonds ) मायकल क्लार्कसोबतच्या ( Michael Clark ) कट्टू संबंधांवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलमध्ये मिळालेल्या पैशांमुळे दोन्ही खेळाडूंच्या नात्यात दुरावा कसा निर्माण झाला हे त्याने सांगितले.

अँड्र्यू सायमंड्स ( Andrew Symonds ) आणि मायकेल क्लार्क यांनी खूप काळ एकत्र क्रिकेट खेळले आहे. दोघांचेही एकमेकांशी खूप चांगले नाते होते. तथापि, सायमंड्सच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसांत, त्याचे क्लार्कशी नाते बिघडले. सायमंड्सच्या म्हणण्यानुसार, त्याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी भरपूर पैसे मिळाले आणि त्यामुळेच मायकेल क्लार्क त्याच्यावर जळत होता. आयपीएलचा पहिला हंगाम 2008 साली खेळला गेला होता. या हंगामाच्या लिलावात सायमंड्स हा दुसरा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. डेक्कन चार्जर्स हैदराबादने ( Deccan Chargers Hyderabad ) त्याच्यासाठी जोरदार बोली लावली होती. यामुळे क्लार्क त्याच्यावर जळत होता, असे सायमंड्सचे मत आहे.

फॉक्स स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, ब्रेट लीसोबतच्या संभाषणात अँड्र्यू सायमंड्स म्हणाला, "जेव्हा मायकल क्लार्क संघात आला, तेव्हा आम्ही खूप जवळ आलो. मी त्याच्यासोबत खूप फलंदाजी करायचो आणि त्याची खूप काळजी घेतली आणि आम्ही खूप चांगले संबंद होते. जेव्हा आयपीएल सुरू झाली, तेव्हा मला त्यात खेळण्यासाठी खूप पैसे मिळाले. त्यामुळेच त्याच्यामध्ये थोडी ईर्षा आली आणि त्यातूनच आमचे नाते तुटले. पैसा ही चांगली गोष्ट आहे पण त्यामुळे नुकसानही होऊ शकते. माझ्या मते पैशांमुळेच आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. आता तो माझा मित्र नाही. त्यामुळे मला त्याचा काही त्रास नाही."

मायकेल क्लार्कने सायमंड्सवर खुप तिखट आणि जोरदार प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्याने त्याच्या 2015 च्या ऍशेस डायरीमध्ये लिहिले की, सायमंड्स टीव्हीवर त्याच्या नेतृत्वावर टीका करण्यासाठी गेला होता. त्याला कोणाच्याही कर्णधारपदावर प्रश्न शंका घेण्याचा अधिकार नाही.

हेही वाचा - IPL 2022 MI vs LSG : मुंबईच्या पलटन समोर आज लखनौच्या नवाबांचे आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.