ETV Bharat / sports

महिला क्रिकेट विषयी अफगाणिस्तान बोर्ड देणार मोठी अपडेट

author img

By

Published : Sep 12, 2021, 4:47 PM IST

ACB chairman to work on start of women cricket in afghanistan
महिला क्रिकेट विषयी अफगाणिस्तान बोर्ड देणार मोठी अपडेट

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आली. यानंतर तालिबानने महिलांना क्रिकेटसह आणखी काही खेळ खेळण्यास बंदी घातली. आता ही बंदी काढण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

काबुल - अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी चेअरमन अजिजुल्लाह फजली यांनी सांगितलं की, देशातील महिला कशा पद्धतीने क्रिकेट खेळू शकतील, याबद्दल लवकरच भूमिका स्पष्ठ करण्यात येईल. दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये महिलांना क्रिकेटसह अनेक खेळ खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच महिला संघातील खेळाडूंनी देश सोडल्याचे देखील वृत्त आहे. या वृत्तावर फजली यांनी सर्व खेळाडू अफगाणिस्तानमध्येच असल्याचे सांगितलं आहे.

अजिजुल्लाह फजली यांनी एसबीएस रेडियोशी बोलताना सांगितलं की, आम्ही महिला कशापद्धतीने क्रिकेट खेळू शकतील, याविषयीची भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहोत. महिलांना आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी परवानगी देणार आहोत. याविषयी लवकरच आम्ही चांगली बातमी देऊ.

फजली यांनी सांगितलं की, महिला क्रिकेटर आपल्या घरी सुरक्षित आहेत. ते म्हणाले की, महिला क्रिकेट संघाच्या प्रसिक्षक डियाना बाराकजयी आणि खेळाडू सुरक्षित आहेत. ते आपापल्या घरी आहेत. काहींनी त्या खेळाडूंनी देश सोडल्याचे सांगितलं पण त्यांनी देश सोडलेला नाही.

फजली यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विनंती केली आहे की, त्यांनी यावर्षी नोव्हेंबर महिन्यात होबार्टमध्ये अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या पुरूष यांच्यात होणारा एकमात्र कसोटी सामना रद्द करू नये.

दरम्यान, फजली यांच्या वक्तव्याच्या विरोधात अहमदुल्लाह वसिक यांचे वक्तव्य आहे. वासिक हे तालिबान कल्चरल कमिशनचे अधिकारी आहेत. ते म्हणाले की, महिला क्रिकेटसोबत इतर खेळ खेळावं हे गरजेचे नाही. क्रिकेटमध्ये अशी स्थिती येऊ शकते, ज्यात त्यांचा चेहरा आणि शरीर झाकलेला नसू शकतो.

हेही वाचा - IPL 2021 च्या उर्वरित हंगामाला सुरूवात होण्याआधीच इंग्लंडच्या 3 दिग्गज खेळाडूंची माघार

हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी श्रीलंका संघाची घोषणा, 'या' 15+4 खेळाडूंना मिळाली संधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.