थॉमस कप, उबेर कप आणि सुदीरमन कपसाठी भारतीय संघाची घोषणा

author img

By

Published : Sep 5, 2021, 8:21 PM IST

Saina Nehwal, B Sai Praneeth to lead Indian challenge in Thomas and Uber Cup Finals, Sindhu rested

डेन्मार्कमध्ये होणाऱ्या थॉमस आणि उबेर कप स्पर्धांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा 9 ते 17 ऑक्टोंबर या दरम्यान, रंगणार आहे. तर फिनलँडमध्ये होणाऱ्या सुदीरमन कप स्पर्धेसाठी 12 सदस्यीय भारतीय संघ देखील निवडण्यात आला आहे.

मुंबई - भारतीय बॅडमिंटन महासंघाने डेन्मार्कमध्ये होणाऱ्या थॉमस आणि उबेर कप या स्पर्धांसाठी संघाची घोषणा केली आहे. स्टार महिला टेनिसपटू सायना नेहवाल आणि बी साई प्रणीत हे अनुक्रमे महिला आणि पुरूष संघाचे नेतृत्व करतील. ही स्पर्धा 9 ते 17 ऑक्टोंबर या दरम्यान, रंगणार आहे.

बीएआयने 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर यादरम्यान फिनलँडमध्ये होणाऱ्या सुदीरमन कप स्पर्धेसाठी 12 सदस्यीय भारतीय संघाची देखील घोषणा केली आहे.

थॉमस आणि उबेर कपसाठी लंडन ऑलिम्पिकमधील कास्य पदक विजेती सायना नेहवाल, मालविका बंसोद, अदिती भट्ट आणि तसनीम मीर यांच्यासोबत 10 सदस्यीय महिला संघात तनिषासह तीन युवा जोडी असणार आहेत. यात क्रॉस्टो आणि ऋतुपर्णा पांडा याचा देखील समावेश आहे. या स्पर्धेसाठी निवड, ट्रायलमधील प्रदर्शनावरुन करण्यात आली आहे.

दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचा समावेश संघात करण्यात आलेला नाही. कारण तिने तिचे नाव यात सहभागी करू नये, असे सांगितलं होतं.

थॉमस कपमध्ये भारतीय टीमला ग्रुप सी मध्ये गत विजेता चीन सोबत ठेवण्यात आलं आहे. ज्यात नेदरलँड आणि ताहितीसह आणखी दोन संघाचा समावेश आहे. उबेर कपमध्ये महिला संघाचा समावेश थायलँड, स्पेन आणि स्कॉटलँडसोबत ग्रुप बी मध्ये करण्यात आला आहे.

थॉमस आणि उबेर कपसाठी असा प्रकारे आहे संघ -

  • पुरूष: बी. साई प्रणीत, किदाम्बी श्रीकांत, किरण जॉर्ज, समीर वर्मा, सात्विकसाईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, ध्रुव कपिला, एमआर अर्जुन, कृष्ण प्रसाद गरागा, विष्णु वर्धन.
  • महिला : सायना नेहवाल, मालविका बंसोड, अदिती भट्ट, तसनीम मीर, तनीषा क्रॉस्टो, ऋतुपर्णा पांडा, अश्विनी पोनप्पा, एन सिक्की रेड्डी, गायत्री, तरिसा जॉली.

सुदीरमन कप

  • पुरूष : बी साई प्रणीत, किदाम्बी श्रीकांत, सात्विकसाईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, ध्रुव कपिला, एमआर अर्जुन.
  • महिला : मालविका बंसोड, अदिती भट्ट, तनीषा क्रॉस्टो, ऋतुपर्णा पांडा, अश्विनी पोनप्पा, एन सिक्की रेड्डी.

हेही वाचा - सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह करतोय ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर

हेही वाचा - ENG vs IND: रवी शास्त्रींना कोरोनाची लागण, प्रशिक्षकांसह 4 जण विलगीकरणात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.