ETV Bharat / sitara

Tarak Mehata Babita Arrest : तारक मेहता..फेम बबीताला अटक, वाचा - पुढे काय घडले?

author img

By

Published : Feb 8, 2022, 1:16 PM IST

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मुनमुन दत्ताला ( Tarak Mehata fame Babita Arrest )अटक करण्यात आली होती. चार तास चौकशी केल्यानंतर तिला अंतरिम जामीन मिळाला आहे.

मुनमुन दत्ताला अटक
मुनमुन दत्ताला अटक

हांसी ( हरियाणा ) - 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) उर्फ ​​बबिता ( ( Tarak Mehata fame Babita Arrest ) हिला सोमवारी हांसी पोलीस ठाण्यात अटक झाली. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात तपास अधिकारी डीएसपी विनोद शंकर यांच्यासमोर ती हजर झाली. तपास अधिकाऱ्याने तिला औपचारिकरित्या अटक केली आणि त्याच्या कार्यालयात सुमारे 4 तास चौकशी केली. यानंतर आरोपी मुनमुन दत्ताची अंतरिम जामिनावर (Interim Bail) सुटका करण्यात आली.

गेल्या वर्षी 9 जानेवारी रोजी मुनमुन दत्ताने यूट्यूबवर एक व्हिडिओ जारी केला होता आणि अनुसूचित जातीच्या समाजाविरोधात असभ्य आणि अपमानजनक टिप्पणी केली होती, त्यानंतर तक्रारदार रजत कलसन यांनी 13 मे 2021 रोजी मुनमुन दत्ता विरुद्ध हांसी पोलिसात एससी एसटी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

यानंतर मुनमुन दत्ताने आपल्यावर दाखल केलेला खटला रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने 22 सप्टेंबर 2021 रोजी फेटाळली होती. हिसार येथील एससी-एसटी कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने 28 जानेवारी रोजी मुनमुन दत्ताचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता, त्यानंतर मुनमुन दत्ताने अटकपूर्व जामिनासाठी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात आश्रय घेतला होता.

४ फेब्रुवारी रोजी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अवनीश झिंगन यांनी मुनमुन दत्ताला हांसी येथे तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहून तपासात सहभागी होण्यास सांगितले होते. मुनमुन दत्ताला अटक करून चौकशी केल्यानंतर अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय 25 फेब्रुवारीला तपास अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्याच्या सूचना तपास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - Jhund Teaser : उत्सुकता शिगेला पोहोचवणारा 'झुंड'चा टीझर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.