ETV Bharat / sitara

महाराष्ट्रातील पहिल्या महिला रिक्षाचालक रेखा दुधाणे पोहोचल्या ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील योगिता चव्हाणला भेटायला!

author img

By

Published : Oct 1, 2021, 3:05 PM IST

महाराष्ट्रातील पहिल्या महिला रिक्षाचालक रेखा दुधाणे
महाराष्ट्रातील पहिल्या महिला रिक्षाचालक रेखा दुधाणे

‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील नायिका अंतरा रिक्षाचालक आहे. तिने रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. अंतराची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री योगिता चव्हाण ला नुकतंच एक सरप्राईज मिळालं. सेटवर अंतराला म्हणजेच योगिताला भेटायला आल्या रेखा दुधाणे ज्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला रिक्षाचालक आहेत.

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिका सध्या बरीच गाजते आहे. मालिकेत अंतराची भूमिका योगिता चव्हाण साकारते आहे. ‘रिक्षा चालवणे शिकले पण खरी गंमत तेव्हा आली जेव्हा मला रिक्षा चालवताना संवाद देखील बोलायचे होते, ॲक्टिंग देखील करायची होती. पण म्हणता म्हणता मालिकेतील अंतरा आणि माझी हमसफर (रिक्षा) यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. मग माझा हमसफर सोबतचा संवाद असो व माझं आणि हमसफर चं नातं असो, मला नेहमीच ‘तिने’ आधार दिला’, योगिताने सांगितले.

महाराष्ट्रातील पहिल्या महिला रिक्षाचालक रेखा दुधाणे
महाराष्ट्रातील पहिल्या महिला रिक्षाचालक रेखा दुधाणे

रेखा दुधाणे यांच्या भेटीबद्दल योगिता म्हणाली, “रेखा दुधाणे महाराष्ट्रातील पहिल्या महिला रिक्षाचालक. त्या अचानक एक दिवस आम्हाला भेटायला जीव माझा गुंतला मालिकेच्या सेटवर आल्या. जेव्हा त्या रूममध्ये आल्या तेव्हा त्यांची डॅशिंग पर्सनॅलिटी बघून मला काही शब्दच सुचले नाही. त्यांचा तो खाकी गणवेश आणि चेहर्‍यावर एक वेगळंचं तेज होतं. त्यांनी गोड अशी स्माईल देत, रिक्षाची चावी फिरवत रूममध्ये एंट्री केली. त्यांना समोर बघून अचानक अंतराचं भविष्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. मला माझ्यावर सोपावलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक प्रकार्षाने झाली.”

महाराष्ट्रातील पहिल्या महिला रिक्षाचालक रेखा दुधाणे
महाराष्ट्रातील पहिल्या महिला रिक्षाचालक रेखा दुधाणे

योगिता पुढे म्हणाली की, ‘मला या गोष्टीचा आनंदसुध्दा झाला की, मालिकेद्वारे आपण अशा एका पर्सनॅलिटीला रीप्रेसेंट करतो आहे. जेव्हा त्यांनी अंतराची स्तुती केली तेव्हा मी कसेबसे माझे अश्रु आवरू शकले. त्या नुसत्या रिक्षाचालक नसून नर्सदेखील आहेत. रेखा ताईंनी आयुष्यात मुलगी, बहीण, बायको आणि अश्या अनेक जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. गेले तीसहून अधिक वर्ष नर्सिंग बरोबरच रिक्षा चालवून संसाराला चांगलाच हातभार लावत आहेत. मला आशा आहे रेखा ताईंच्या आशीर्वादाने आणि तमाम महाराष्ट्राचं प्रेम या दोन्हीमुळे मी देखील अंतराच्या भूमिकेला न्याय देऊ शकेन”.

हेही वाचा - ‘केबीसी’मध्ये बिग बी सांगताहेत त्यांच्या आयुष्यातील ‘आनंद’ इफेक्ट!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.