ETV Bharat / sitara

प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पडणारे ‘झिम्मा'चे ‘माझे गाव' गाणे!

author img

By

Published : Nov 2, 2021, 9:56 PM IST

'झिम्मा' चित्रपटाच्या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 'झिम्मा'च्या टिझरमुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता शीर्षक गीताच्या प्रदर्शित होण्याने अधिकच वाढली आहे.

'झिम्मा' चित्रपटातील ‘माझे गाव'  गाणे
'झिम्मा' चित्रपटातील ‘माझे गाव' गाणे

वेगवेगळया पार्श्वभूमी, व्यक्तिमत्व असलेल्या स्त्रिया जेव्हा आपल्या सर्व जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आपले आयुष्य मनमुराद जगण्यासाठी एकत्र येतात तेव्हा जी धमाल होते, ती ‘झिम्मा’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या जबरदस्त अभिनेत्रींसोबत सिद्धार्थ चांदेकरही दिसणार आहे. 'झिम्मा' चित्रपटाच्या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 'झिम्मा'च्या टिझरमुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता शीर्षक गीताच्या प्रदर्शित होण्याने अधिकच वाढली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'झिम्मा' चित्रपटातील ‘माझे गाव' हे अतिशय वेगळ्या धाटणीचे गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले असून अपेक्षा दांडेकर यांनी हे गाणे गायले आहे. ''कुठल्या नभाच्या पार आहे माझे गाव'' असे या गाण्याचे शब्द असून हे गाणे प्रेक्षकांना अंतर्मुख करायला भाग पाडते. हे गाणे ऐकताना मन अतिशय शांत होते आणि विचारांचा वेग मंदावतो व ओठांवर मंद हास्य उमटते. ही या गाण्याची जादू आहे.

'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांनी साकारलेल्या वेगवेगळ्या वयोगटाच्या व्यक्तिरेखा आणि एकमेकींना पूर्णपणे अनोळखी असलेल्या स्त्रिया मनमुराद जगण्यासाठी काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत इंग्लंड ला जातात आणि मग काय धम्माल होते, हे लवकरच प्रेक्षकांना ‘झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ चित्रपट १९ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा - ‘तडप'मधील 'तुमसे भी ज्यादा' गाण्यात गुलाबी रोमान्स आणि इंटेन्स ॲक्शनचा मिलाफ!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.