ETV Bharat / sitara

'या' कारणामुळे सलमान खानसाठी 'गॅलक्सी अपार्टमेंट' आहे खास...

author img

By

Published : Mar 17, 2020, 11:22 PM IST

बऱ्याच वर्षापासून सलमान खान वांद्रे येथील गॅलक्स अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये राहत आहे. ही जागा त्याच्यासाठी खूप खास आहे.

Salman Khan Memories Related with his Galaxy Apartment
'या' कारणामुळे सलमान खानसाठी 'गॅलक्सी अपार्टमेंट' आहे खास...

मुंबई - बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानने आपल्या अभिनयाने वर्षानुवर्षापासून प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. तरीही त्याचे राहणीमान अत्यंत साधे आहे. बऱ्याच वर्षापासून तो वांद्रे येथील गॅलक्स अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये राहत आहे. ही जागा त्याच्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे तो ही जागा सोडण्याचा कधीही विचार करत नाही.

सलमान खानने या मागचे कारण सांगितले होते, की 'मोठ्या आणि स्टायलिश बंगल्यात राहण्यापेक्षा मला गॅलक्सीच्या फ्लॅटमध्येही राहायला आवडते. कारण या फ्लॅटमध्ये माझे आई-वडील माझ्यासोबत वरच्या घरात राहतात. ही पूर्ण इमारत एखाद्या कुटुंबाप्रमाणे आहे. जेव्हा आम्ही लहान होतो, तेव्हा सर्व लहान मुले या इमारतीच्या खाली असणाऱ्या बागेमध्ये खेळायचो. त्यावेळी वेगवेगळी घरं नव्हती. आम्ही कोणाच्याही घरी जेवायला जायचो. या फ्लॅटसोबत माझ्या बऱ्याच अविस्मरणीय आठवणी आहेत, असे तो म्हणाला होता.

एका जुन्या मुलाखतीमध्ये सलमानचे वडील सलीम यांनीदेखील या फ्लॅटशी संबंधित काही आठवणी सांगितल्या होत्या. 'या घरापासून वेगळे होण्याचा मी विचारही करू शकत नाही', असे ते म्हणाले होते.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं, तर सलमान खान आगामी 'राधे-मोस्ट वान्टेड भाई' या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत दिशा पाटणी, रणदीप हुड्डा यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रभू देवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट 'वॉन्टेड'चा सिक्वेल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.