ETV Bharat / sitara

नागराज मंजुळे यांचा ‘जयंती’ चित्रपटाला पाठिंबा; जयंती होतोय आज प्रदर्शित

author img

By

Published : Nov 11, 2021, 3:42 AM IST

उत्तम कथानकाचे जाणकार नागराज मंजुळे यांनी बहुचर्चित मराठी चित्रपट "जयंती" चा ट्रेलर त्यांच्या सोशल मीडियावर शेयर करत ‘जयंती’ च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या आहेत.

nagraj manjule lends support to jayanti
नागराज मंजुळे यांचा ‘जयंती’ चित्रपटाला पाठिंबा

मुंबई - लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ मधून मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला. मराठी सिनेसृष्टीत ज्यांचं नाव आज अभिमानाने घेतले जाते असे दिग्दर्शक, कलाकार नागराज मंजुळे नेहमीच कलेमार्फत वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर भाष्य करताना दिसतात. "फँड्री", "सैराट", "नाळ" तसेच "पावसाचा निबंध" या त्यांच्या अफलातून कलाकृतींना प्रेक्षकवर्गांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्यांच्याकडे असलेल्या सिनेमाविषयी माहितीमुळे अनेक नवोदित तरुण त्यांच्याकडे सल्ला मागत असतात.

नागराज मंजुळे यांनी जयंतीच्या टीमला दिल्या शुभेच्छा -

उत्तम कथानकाचे जाणकार नागराज मंजुळे यांनी बहुचर्चित मराठी चित्रपट "जयंती" चा ट्रेलर त्यांच्या सोशल मीडियावर शेयर करत ‘जयंती’ च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या आहेत. फेसबुकवर जयंतीचे "बॅज" लावून तयार केलेले स्वतःचे पोस्टर व्हायरल करणं, ताल धरायला लावणाऱ्या या सिनेमाच्या गाण्यांचे रिल्स बनवून ते व्हायरल करणारे तरुणवर्ग आणि प्रसार माध्यमांमधल्या चर्चा अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गांनी आगामी मराठी चित्रपट "जयंती" गेल्या काही दिवसांपासून सर्वांच्याचे उत्सुकता वाढवत आहे.

हे आहेत जंयती मुख्य किरदार -

मागील आठवड्यात जयंती सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर जारी करण्यात आला आणि सहा दिवसात तब्बल १२ लाखाच्या वर लोकांनी ट्रेलर पहिला आहे तसेच पसंतीदेखील दिली आहे. सिनेमाच्या २ गाण्यांना देखील लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘जयंती’ सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता ऋतुराज वानखेडे आणि अभिनेत्री तितिक्षा तावडे मराठी सिनेसृष्टीत प्रथम पदार्पण करत आहेत, तर त्याचप्रमाणे सिनेमामध्ये ज्येष्ठ अभिनेते वीरा साथीदार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, तसेच पॅडी कांबळे आणि अंजली जोगळेकर यांच्या देखील भूमिका आहेत.

१२ नोव्हेंबर पासून प्रदर्शित -

दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित 'जयंती’ सिनेमा येत्या १२ नोव्हेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - हिमाचल : शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा धर्मशाळा येथे एकत्र; चामुंडा देवी, ज्वालाजी मंदिराला दिली भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.