ETV Bharat / sitara

कमाल खानच्या 'या' ट्विटमुळे खवळले जावेद जाफरी; दिले सडेतोड उत्तर

author img

By

Published : Jun 2, 2019, 12:46 PM IST

कमाल खान म्हणजे केआरके नेहमीच त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहतो. केआरकेचे एक ट्विट वाचून जावेद जाफरीने लगेच यावर आपलं सडेतोड उत्तर दिले.

कमाल खानच्या 'या' ट्विटमुळे खवळले जावेद जाफरी; दिले सडेतोड उत्तर

मुंबई - बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान जाफरी हा लवकरच 'मलाल' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात शर्मिन सेहगल हीदेखील झळकणार आहे. 'मलाल'चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरवर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. मात्र, हा ट्रेलर पाहून अभिनेता कमाल आर. खान याने अशी काही प्रतिक्रिया दिली, की ती वाचुन जावेद जाफरी खवळले होते.

कमाल खान म्हणजे केआरके नेहमीच त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहतो. त्याने मिजान आणि शर्मिनबद्दल देखील वादग्रस्त ट्विट केले.
'चित्रपट निर्माते घराणेशाहीच्या एवढ्या आहारी गेले आहेत, की कोणताही अभिनय न येणाऱ्या स्टारकिड्सला ते चित्रपटात संधी देतात. कोणतेही गुण आणि भयानक दिसणाऱ्या कलाकारांना जर ते लॉन्च करत असतील तर हा गुन्हा आहे. अशा कलाकारांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकही आपला वेळ आणि पैसा खर्च करणार नाहीत. त्यामुळे लोक मूर्ख आहेत आणि त्यांना यापूढेही मूर्ख बनवले जाऊ शकते, असे जर बॉलिवूडला वाटत असेल, तर त्यांनी असा विचार करणे बंद करावे,’ असे केआरकेने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

केआरकेचे हे ट्विट वाचून जावेद जाफरीने लगेच यावर आपलं सडेतोड उत्तर दिले. 'असं ट्विट करणारा एक निराश आणि अपयशीच कलाकार असू शकतो. मी काही अशा कलाकारांची नावे देतो, जे घराणेशाहीतूनच सुपरस्टार झाले आहेत. आमिर खान, सलमान खान, फरहान अख्तर, अभिषेक बच्चन, संजय दत्त, सनी देओल, सैफ अली खान, ऋषी कपूर, करिश्मा कपूर, करिना कपूर, काजोल, रवीना टंडन... आणि आणखी बरेच. हे देखील प्रेक्षकांना मुर्ख बनवत आहेत का?' असे जावेद जाफरी यांनी लिहिले आहे.

पुढे त्यांनी आणखी एक ट्विट करुन लिहिलेय की 'जिथे प्रचंड स्पर्धा आणि पैशांचा प्रश्न आहे, तिथे कुठलाही निर्माता हॉरीबल, डफर कलाकारांवर पैसा लावणार नाही. इंडस्ट्रीत असलेल्या ओळखीच्या भरवशावर केवळ इंटरव्ह्यूपर्यंत पोहचता येऊ शकते. मात्र, नंतर ते टॅलेंटच कामात येते. शेवटी प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यासाठी त्यांना दिवसरात्र कष्ट करावे लागतात,' असेही जावेद जाफरीने कमाल खानला सुनावले.

Intro:Body:

Entartainment


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.