ETV Bharat / sitara

‘सिम्बॉयसिस’च्या महिला वैद्यकीय महाविद्यालयात मुलींसाठी ‘आनंदी गोपाळ शिष्यवृत्ती' घोषित!

author img

By

Published : Feb 13, 2021, 7:29 PM IST

Zee Studios' Anandi Gopal
मुलींसाठी ‘आनंदी गोपाळ शिष्यवृत्ती' देण्याची घोषणा

१८८६ साली जेव्हा स्त्रीने उंबरठा ओलांडून जाणे समाजमान्य नव्हते तेव्हा परदेशी जाणारी पहिली स्त्री म्हणजेच भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. त्यांच्या जीवनावर आधारित आनंदी गोपाळ या चित्रपटाची निर्मिती झी स्टुओने केली होती. सिम्बायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष, डॉ. शां. ब. मुजुमदार 'आनंदी गोपाळ' या चित्रपटातून प्रेरणा घेत ‘सिम्बॉयसिस’च्या महिला वैद्यकीय महाविद्यालयात मुलींसाठी ‘आनंदी गोपाळ शिष्यवृत्ती' देण्याची घोषणा केली आहे.

झी स्टुडिओजच्या ‘आनंदी गोपाळ’ ने नवा इतिहास रचला आहे आणि अनेकांना प्रेरित केलंय. आनंदी गोपाळ यांनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी वेगळी वाट निवडली आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी नवीन पाऊलवाट मोकळी करून दिली. आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे ध्यासपर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिम्बायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष, डॉ. शां. ब. मुजुमदार 'आनंदी गोपाळ' या चित्रपटातून महिला वैद्यकीय महाविद्यालय आणि मोफत सेवा देणारे रुग्णालय या दोन्हीसाठी प्रेरणा मिळाल्याचं सांगतात. चित्रपट हे जरी मनोरंजनाचे माध्यम असलं तरी काही चित्रपट असतात जे मनोरंजनापलीकडे जाऊन कधी आपल्याला अंतर्मुख करतात तर कधी एक अनोखी प्रेरणा देऊन जातात. काही चित्रपट स्तिमित करणारे ठरतात तर काही अंतर्मुखतेचा संथ, समृद्ध अनुभव देणारे ठरतातं ज्यानं समाजात मोठे बदल घडून येतात. समाजात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात 'आनंदी गोपाळ' चं नाव अग्रेसर असावं.

Zee Studios' Anandi Gopal
झी स्टुडिओजचा ‘आनंदी गोपाळ’ चित्रपट
वयाच्या केवळ अठराव्या वर्षी सातासमुद्रापार परदेशी जाणारी पहिली स्त्री म्हणजे आनंदीबाई जोशी. त्यांना फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करावे लागले होते तरीही त्यांनी वैद्यकीय शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. १८८६ साली जेव्हा स्त्रीने उंबरठा ओलांडून जाणे समाजमान्य नव्हते तेव्हा परदेशी जाणारी पहिली स्त्री म्हणजेच भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. झी स्टुडिओजनं आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी यांचा जीवनप्रवास ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटातून इतिहासाच्या सोनेरी पानांवरुन रुपेरी पडद्यावर उलगडला आणि बॉक्सऑफिसवर हाउसफुलचे बोर्ड झळकले, या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला व समीक्षकांनीही उचलून धरले."आनंदीबाईंनी जी चिकाटी, जिद्द आणि धाडस त्या काळात दाखवले ते खरेच अतुलनीय असून ते चित्रपट पाहून अक्षरशः हेलावून गेलो. समाजाचा विरोध असून देखील आनंदीबाई त्यांच्या ध्येयापर्यंत पोचल्या आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. हे पाहून मी मुलींसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय तातडीनं घेतला आणि तो पूर्णत्वास नेला. हे भारतातील तिसरे आणि महाराष्ट्रातील एकमेव महिला वैद्यकीय महाविद्यालय असून पाच गुणवंत मुलींना ‘आनंदी गोपाळ शिष्यवृत्ती'सुद्धा दिली जाणार आहे” असे डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी घोषित केले. या निमित्ताने झी स्टुडिओज मराठीचे बिजनेस हेड, मंगेश कुलकर्णी म्हणाले, "ही बातमी एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आली आहे. खरं तर ही आनंदीबाई आणि गोपाळराव यांची पुण्याई आहे. या निमित्ताने कलेची आणि ओघाने चित्रपटाची ताकद फार मोठी असते हे सिद्ध झालंय. झी स्टुडिओजच्या माध्यमातून उत्तमोत्तम कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न कायम होता आणि या पुढेही राहील. आनंदीबाई आणि गोपाळराव ह्या ध्येयवेड्या जोडप्याची असामान्य कथा, ‘डॉ. आनंदी गोपाळ जोशी-भारतातली पहिली महिला डॉक्टर यांचा प्रवास’ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आला याचा सार्थ अभिमान आहे. सर्जनशील दिग्दर्शकाचं आणि त्यातही कथात्मक लेखकाचं कौशल्य प्रेक्षकांच्या अनुभवात भर घालत असते, तर कधी पुनःप्रत्ययाचा आनंद देत असते. ह्याचं श्रेय दिग्दर्शक समीर विद्वांस आणि चित्रपटाची पूर्ण टीम यांना जातं. डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे मनापासून अभिनंदन करतो."चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस म्हणाले, "आनंदी गोपाळ पाहून मुजुमदार सरांना वाटलं की आपणही फक्त मुलींसाठी वैद्यकीय महाविद्यालय काढावं आणि सिम्बायसीसचं मुलींचं वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं. ही गोष्ट खूप भावूक करणारी आहे आणि आनंदीच्या संपूर्ण टीमसाठी तर ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. कुठल्याही पुरस्कारापेक्षा हा खूप मोठा पुरस्कार आहे. मुजुमदार सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला सलाम!"

हेही वाचा - ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला ‘गर्लफ्रेंड’ भेटायला येतेय शेमारू मराठीबाणावर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.