ETV Bharat / sitara

विक्की आणि कॅटरिना 'रिलेशनशिप'मध्ये, हर्षवर्धन कपूरने केला गौप्यस्फोट

author img

By

Published : Jun 9, 2021, 6:50 PM IST

Updated : Jun 9, 2021, 8:22 PM IST

विक्की कौशल आणि कॅटरिना कैफच्या रिलेशनची सध्या चंदेरी दुनियेत चर्चा आहे. दोघांनीही नाते गुलदस्त्यात ठेवले असले तरी हर्षवर्धन कपूरने त्यांच्या नात्याबद्दल दुजोरा दिला आहे.

Vicky Kaushal-Katrina Kaif are a couple
विक्की आणि कॅटरिना 'प्रेमीयुगुल'

मुंबई - अभिनेता विक्की कौशल आणि कॅटरिना कैफच्या कथित रोमान्सची चर्चा सध्या मनोरंजन जगतात रंगत असते. दोघांनीही आपल्या नात्याबद्दलचा खुलासा केलेला नाही. परंतु अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर याने विक्की आणि कॅटरिनाच्या रिलेशन स्टेटसबद्दल प्रतिक्रिया दिल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

या वर्षाच्या सुरूवातीला कॅटरिनाने विक्कीला मिठी मारल्याचा एक फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी दोघे लव्हबर्ड्स असल्याचे गृहित धरायला सुरुवात केली होती. खरतर फोटोत विक्कीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता मात्र चाहत्यांनी तो विक्कीच असल्याचे पक्के ठरवले होते. हे दोघेही जेव्हा एप्रिलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आले तेव्हा या अफवेचा वणवा भडकला होता.

विक्की आणि कॅटरिना यांनी आपल्या प्रेमाचे गुपित गुलदस्त्यात बंद केले असले तरी हर्षवर्धन कपूरने ही जोडी एकत्र असल्याच्या बातमीला दुजोरा दिला असल्यामुळे विक्कीचे चाहते खूश झाले आहेत.

''सध्या सुरू असलेल्या अफवांपैकी कोणत्या जोडीचे प्रेम प्रकरण अफवा नसून खरे आहे?", असा प्रश्न हर्षवर्धनाला चॅट शोमध्ये विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना तो म्हणाला, "विक्की आणि कॅटरिना एकत्र आहेत, हे खर आहे." पण लगेचच तो म्हणाला, "यासाठी मी त्यांना अडचणीत तर आणत नाही ना?"

विशेष म्हणजे हर्षने विक्की-कॅटरिनाच्या रिलेशनबद्दल नॅशनल टीव्हीवर दुजोरा दिला असला तरी त्याच्या स्वतःबद्दलच्या (हर्षवर्धनच्या) रिलेशनच्या कोणत्या अफवा खऱ्या आहे? असे विचारला असता तो म्हणाला, "काहीही नाही."

कालच दुपारी ३.३० वाजता विक्की कौशल याला कॅटरिनाच्या घरी जाताना पाहण्यात आले होते. जवळपास पाच तासानंतर तेथून तो निघून गेला.

हेही वाचा - बिग बी शुटिंगसाठी पुन्हा सज्ज, 'या' चित्रपटाचे सुरू करणार शुटिंग

Last Updated :Jun 9, 2021, 8:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.