ETV Bharat / sitara

वरुण धवनने पार केला 3 कोटी फॉलोअर्सचा आकडा, मानले चाहत्यांचे आभार

author img

By

Published : Jul 7, 2020, 8:04 PM IST

Varun Dhawan
वरुण धवन

इंस्टाग्रामवर 30 दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा ओलांडताना वरुण धवनने मंगळवारी चाहत्यांनी बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. चाहत्यांनी त्याच्यावर प्रेम केल्याबद्दल त्यांचे आभारही वरुणने मानले आहेत.

मुंबईः बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने मंगळवारी इन्स्टाग्रामवर ३ कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला. आपल्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्याने चाहत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

वरुणने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याच्या चित्रपटांचे झलक आणि त्याने साकारलेल्या बर्‍याच भूमिकांची दृष्ये समाविष्ट आहेत.

"30 MILLION #varuniacs... ... माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद," असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

धवन याने हा विशेष व्हिडिओ तयार करणाऱ्या त्याच्या चाहत्याचे आभार मानले आहेत.

ऑक्टोबर आणि बदलापूर सारख्या क्लासिक चित्रपटामुळे खूप लोकप्रिय आहे. त्याने बद्रीनाथ की दुल्हनिया, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया आणि जुडवा 2 यासारख्या रोमँटिक विनोदी चित्रपटातही काम केले आहे.

हेही वाचा - किंग खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर.. राजकुमार हिरानींच्या आगामी सिनेमात शाहरुख खान

धवनने करण जोहरच्या दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचा पहिला चित्रपट होता.

वरुण धवन अखेरच्या 'स्ट्रीट डान्सर 3 डी' चित्रपटामध्ये दिसला होता. त्याचा पुढील चित्रपटाचा कुली 'नंबर 1' हा आहे. त्याचे वडील डेव्हिड धवन याचे दिग्दर्शिन करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.