सोनू सूदने घेतली अरविंद केजरीवालांची भेट, तर्क वितर्कांना वेग

author img

By

Published : Aug 27, 2021, 5:24 PM IST

सोनू सूदने घेतली अरविंद केजरीवालांची भेट

लॉकडाऊनच्या काळात हजारो लोकांना त्यांच्या घरापर्यंत सुखरुप पोहोचवणारा आणि असंख्य गरजूंच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असलेल्या सोनू सूदने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेक तर्क वितर्कांना चालना मिळाली आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांनी अभिनेता सोनू सूद यांना मेंटॉर कार्यक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली.

नवी दिल्ली - कोरोनाच्या काळातअसंख्य गरजू लोकांना मदत करून प्रसिद्धी मिळवणारे चित्रपट अभिनेता सोनू सूद यांनी शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. तेव्हापासून सोनू सूद आम आदमी पक्षात सामील होणार असल्याच्या चर्चा रंगू लागली आहे.

पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत आम आदमी पार्टी तेथील शक्यता शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत सोनू सूद आणि अरविंद केजरीवाल यांची झालेली भेट याला निवडणुकांशी जोडून पाहिले जात आहे.

  • मानवता की सेवा में @SonuSood जी के योगदान को हम सबने देखा और सराहा है

    अब सोनू जी दिल्ली के सरकारी स्कूलों में बच्चों के लिए बनाए गए 'देश के मेंटर' प्रोग्राम के ब्रांड एंबेसडर होंगे। सोनू जी का इस कार्यक्रम के साथ जुड़ना निश्चित ही बच्चों के उज्ज्वल भविष्य में मददगार साबित होगा। pic.twitter.com/tOtLcJU3rj

    — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शुक्रवारी झालेल्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी अभिनेता सोनू सूद यांना मेंटॉर कार्यक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली. यानंतर, पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल म्हणाले की सोनू सूद प्रत्येकाच्या मदतीसाठी पोहोचतो आणि तो देशासाठी प्रेरणादायी आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान, जेव्हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारण्यात आले की सोनू सूद यांच्याशी राजकीय चर्चा झाली आहे का? यावर मुख्यमंत्री म्हणाले, ''नाही-नाही, आमच्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.''

सोनूला राजकारणात रस नाही

त्याचवेळी सोनू सूद म्हणाला, ''या देशात राजकारणासारखे काहीच नाही. मुलांच्या भविष्याचा प्रश्न हा राजकारणापेक्षा मोठा प्रश्न आहे. अभिनेता सोनू म्हणाला, मला बऱ्याच काळापासून राजकारणात येण्याची संधी मिळाली आहे, पण मला त्यात रस नाही. माझा तसा कोणताही हेतू नाही''. तो पुढे म्हणाला की ज्याच्याकडे चांगला विचार असतो त्याला नक्कीच चांगली दिशा मिळते.

हेही वाचा - चित्रपटांमध्ये मुघलांना ‘व्हिलन’ दर्शवणे अयोग्य - दिग्दर्शक कबीर खान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.