ETV Bharat / sitara

प्रियांका चोप्रा आणि इतर सेलेब्रिटी करणार प्री-ऑस्कर कार्यक्रमाचे आयोजन

author img

By

Published : Mar 23, 2022, 1:29 PM IST

प्रियांका चोप्रा जोनास, मिंडी कलिंग, कुमेल नानजियानी, अंजुला आचारिया आणि इतरांद्वारे आयोजित केल्या जाणार्‍या दक्षिण आशियाई उत्कृष्टतेचा उत्सव साजरा करणार्‍या प्री-ऑस्कर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपटाबाबत दक्षिण आशियाई उत्कृष्टतेचा आनंद घेण्यासाठी हा कार्यक्रम 23 मार्च रोजी संध्याकाळी होणार आहे.

प्रियांका चोप्रा प्री ऑस्कर कार्यक्रमाचे आयोजन करणार
प्रियांका चोप्रा प्री ऑस्कर कार्यक्रमाचे आयोजन करणार

वॉशिंग्टन (यूएस) - प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा असलेल्या 94 व्या वार्षिक अकादमी पुरस्कारांमध्ये स्टार सेलेब्रिटींच्या पार्ट्यांसह शानदार समारंभाचे भरभरुन वेळापत्रक तयार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आशियाई उत्कृष्टतेचा उत्सव साजरा करणार्‍या प्री-ऑस्कर इव्हेंटचे आयोजन प्रियंका चोप्रा जोनास, मिंडी कलिंग, कुमेल नानजियानी, अंजुला आचारिया, बेला बजारिया, मनीश के. गोया आणि श्रुती गांगुली यांनी केले आहे.

यूटीए, अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस, जॉनी वॉकर, इंडिया सेंटरचा साउथ एशियन आर्ट्स रेझिलन्सी फंड आणि जुगरनॉट प्रायोजक असलेला सोहळा दक्षिण आशियाई चित्रपट उत्कृष्टतेचा गौरव करण्यासाठी 23 मार्च रोजी संध्याकाळी आयोजित करण्यात आला आहे. सन्माननीय पाहुण्यांमध्ये रिझ अहमद आणि सुरोश अल्वी, पावो चॉयनिंग दोरजी, जोसेफ पटेल, रिझ अहमद आणि अनिल कारिया, एलिझाबेथ मिर्झाई आणि गुलिस्तान मिर्झाई आणि रिंटू थॉमस, सुष्मित घोष आणि अनुरिमा भार्गव यांचा समावेश आहे.

या वर्षीचे ऑस्कर अ‍ॅमी शुमर, रेजिना हॉल आणि वांडा सायक्स होस्ट करणार आहेत. हा समारंभ 27 मार्च रोजी हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित केला जाईल आणि रात्री 8 वाजता एबीसीवर थेट प्रसारित होईल.

हेही वाचा - 'दसवी'चा ट्रेलर: यामी गौतमने तुरुंगात अभिषेक बच्चनला शिकवला शिक्षणाचा धडा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.