ETV Bharat / sitara

Pornography Case : 'आमची प्रार्थना तुमच्या कुटुंबासोबत', म्हणत शिल्पा शेट्टीच्या समर्थनार्थ उतरला आर. माधवन

author img

By

Published : Aug 3, 2021, 10:45 PM IST

Pornography Case
शिल्पा शेट्टीच्या समर्थनार्थ उतरला आर. माधवन

राज कुंद्रा प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीला बॉलिवूड चित्रपटसृष्टीच्यावतीने आधीही खूप पाठिंबा मिळाला आहे. आता अभिनेता आर माधवनने शिल्पाच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई - राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली होती. अश्लील चित्रपटांच्या निर्मितीतील मुख्य सूत्रधार असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत राज कुंद्रा पोलीस कोठडीत आहे. याचा त्रास जेवढा त्याला होतोय तितकाच त्याच्या कुटुंबालाही होतोय. शिल्पा शेट्टी देखील आजकाल बऱ्याच समस्यांशी झगडत आहे. मात्र, आता तिला फिल्म इंडस्ट्रीकडूनही भरपूर पाठिंबा मिळत आहे. आता अभिनेता आर माधवन शिल्पाच्या समर्थनार्थ आला आहे.

आर माधवनने दिला शिल्पाला पाठिंबा

अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींनी शिल्पाच्या या कठीण काळात तिची साथ दिली आहे. यामध्ये अनेक अभिनेत्रीही आहेत. आता आर माधवन त्याच्या समर्थनात आला आहे. शिल्पाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना त्याने लिहिले, ''तुम्ही बलवान आहात आणि म्हणूनच माझा विश्वास आहे की तुम्ही या आव्हानाला सन्मानाने मात कराल. आमच्या प्रार्थना तुमच्या कुटुंबासोबत आहेत.''

शिल्पाने लिहिली होती दीर्घ पोस्ट

शिल्पा शेट्टीने दोन दिवसांपूर्वी एक दीर्घ पोस्ट लिहिली होती. ज्यात तिने लिहिले आहे की ती मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवते आणि तपासात पूर्ण सहकार्य करत आहे, पण त्याचबरोबर तिने यावेळी माध्यमांनाही विनंती केली की तिच्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचाही विचार करावा. शिल्पाची ही पोस्ट खूप व्हायरल झाली. त्याचवेळी, इंडस्ट्रीतील तिच्या सहकाऱ्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आणि शिल्पाला पाठिंबा व्यक्त केला.

राज कुंद्राला पोलिसांनी 19 जुलै रोजी रात्री उशिरा अटक केली. माहितीनुसार, पोलिसांनी आधी राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे सादर केले आणि नंतर राज कुंद्राला ताब्यात घेतले. त्याच्या जामिनासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत पण सध्या तो 14 दिवस न्यायालयीन कोठडीत आहे.

हेही वाचा - सारा अलीने आई वडिलांची 'नाक काट दी मैने' म्हणत मागितली माफी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.